शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’अट्टल घरफोड्याकडून ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: August 19, 2016 02:08 IST

सेवाग्राम येथे अटक करण्यात आलेला अट्टल घरफोड्या ओमप्रकाश खांडवे याच्याकडून वर्धेत केलेल्या चोरीतील

वर्धेत केल्या एकूण सात घरफोड्या वर्धा : सेवाग्राम येथे अटक करण्यात आलेला अट्टल घरफोड्या ओमप्रकाश खांडवे याच्याकडून वर्धेत केलेल्या चोरीतील ८६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने स्रेहल नगर येथील राठी यांच्या घरी केलेल्या चोरीची कबुली दिल्याने त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ओमप्रकाश खांडवे (२६) रा. तुळशीनगर, बुलढाणा याला मंगळवारी वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील ओव्हरब्रीजच्या परिसरात अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळून एक देशी बनावटीचे ७.६५ एम.एम. पिस्टल, चार राऊंड, मोबाईल असा एकूण ६१ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्यावर सेवाग्रात पोलिसात गुन्हा दाखल आहे. याचा तपास सुरू असताना खांडवे याने स्रेहल नगर परिसरातील दर्शन राठी यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीचे दागीने, लॅपटॉप, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यातील एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क, लॅपटॉप बॅग, एक सोन्याची चैन अंदाजे २० ग्रॅम वजनाची असा एकूण ८६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी) भंडारा व गोंदियातही चोरी खांडवे याने वर्धा शहर व सेवाग्राम परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. त्यासंबंधाने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून आतापर्यंत त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागीने, मोबाईल, लॅपटॉप, एक स्विफ्ट गाडी आदी माल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या सात गुन्ह्यामधून आरोपीने जामीन मिळविला होता. मात्र त्या काळापासून तो न्यायालयात हजर होत नव्हता. यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयातून अटक वॉरंट सुद्धा निघालेला होता. वर्धेप्रमाणेच त्याने भंडारा येथे दोन व गोंदिया येथे एक घरफोडी केल्याची कबुली दिली.