शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात झाली ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रजातींची नोंद झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, महाराष्ट्राचा राज्य पक्षी पिवळ्या पायाची हरोळी व वर्धेचा शहर पक्षी भारतीय नीलपंख निरीक्षणादरम्यान आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पक्षी निरीक्षण, गणना आणि नोंदी करण्याचा ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ हा उपक्रम १८ ते २१ फेब्रुवारी या काळात राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये वर्धा जिल्ह्यातील पक्षीप्रेमींनी पक्षी निरीक्षणात तब्बल ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतली आहे. जिल्ह्यात विविध अधिवासांवर पक्षीमित्रांनी व्यक्तिगतकरीत्या व समूहाने पक्षी निरीक्षण करून या नोंदी घेतल्या असून पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांनी सर्वाधिक म्हणजे ५१ पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत.जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रजातींची नोंद झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, महाराष्ट्राचा राज्य पक्षी पिवळ्या पायाची हरोळी व वर्धेचा शहर पक्षी भारतीय नीलपंख निरीक्षणादरम्यान आढळले. हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये राजहंस, चक्रवाक, सामान्य क्रौंच, ह्युमचा पर्णवटवट्या, काळा थिरथिरा, कारुण्य कोकीळ, सामान्य गप्पीदास, छोटा टिलवा हे पक्षी आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

राज्यात वर्धा १९ व्या स्थानी

ई-बर्ड या संकेतस्थळावर चार दिवसानंतरच्या नोंदीनुसार संपूर्ण जगभरातून ३,०१,८९१ पक्षी सूचींमध्ये ७,०९९ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. यात भारत १०२२ पक्षी प्रजातींची नोंद करीत जागतिक स्थरावर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतात महाराष्ट्र राज्याने ३७१ पक्षी प्रजातींची नोंद करीत पाचवे स्थान पटकावले आहे. शिवाय महाराष्ट्रातून वर्धेचे स्थान १९ वे आहे. अंतिम अहवाल प्रदर्शित झाल्यावर वरील संख्येमध्ये थोडा बदल संभवतो. २०२२ च्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’मध्ये राहुल वकारे, सफल पाटील, अमेय ठाकरे, डॉ. चेतना उगले, गणराज गल्हाट, राहुल हालदे, शीतल दाते, उत्कर्षा टेंभारे, प्रफुल्ल थोटे, अश्विनी मंगरुळकर, नीलेश पाणबुडे, वैभव पोहणकर, अनिल सावरकर, महेश महाजन, सागर भेंडे हे पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते.

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य