वर्धा : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथकाने दोन ठिकाणी कारवाई करीत ७७ हजार ८०० रुयांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. काजळसरा येथे केलेल्या कारवाईत राजू शिवराम डोंगरे (४४) याच्या जवळून ९ हजार ३०० रुपयांची देशी दारू व सात रुपयांची स्कूटर असा एकूण १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ भिडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत सचिन येळणे (३२), निलेश येळणे (२०), योगेश येळणे (२२) या तिघांजवळून ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ३५ हजार रुपयांची दुचाकी व २४ हजार रुपयांचा दारूसाठा तसेच मोबाईल २ हजार ५०० रुपये आदी साहित्याचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय मते, विवेकानंद धानुले, दिनेश गायकवाड, विवेक बन्सोड, योगेश वानखेडे, घनश्याम पाटील, सुशिल सायरे, श्रीधर उईके यांनी केली़(प्रतिनिधी)
७८ हजारांचा दारूसाठा जप्त
By admin | Updated: April 18, 2015 01:56 IST