शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०० पैकी ७५ जणांना पंडूची लागण

By admin | Updated: April 5, 2015 02:06 IST

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेत ७५ टक्के नागरिकांच्या रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे त्यांना पंडूरोगाची (अ‍ॅनिमिया) लागण झाल्याचे समोर आले आहे.

वर्धा : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेत ७५ टक्के नागरिकांच्या रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे त्यांना पंडूरोगाची (अ‍ॅनिमिया) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात गर्भवती महिला अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी काळजी घेतल्यास त्यावर आळा बसविणे शक्य असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या आजाराचे प्रमाण गर्भवती महिलांमतध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती महिलांना या आजाराची लागण झाल्यास आईचे आरोग्य धोक्यात येऊन बाळाची वाढ खुंटते. अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी गरोदरपणात पोष्टीक, सकस आणि समतोल आहार घेण्याची गरज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास पंडूरोग होतो. वर्धा जिल्ह्यातील ७५ टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांना लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया झाल्याचे समोर आले आहे. यात सुमारे ४८ ते ५० टक्क्याच्या वर गर्भवती महिलांचा समावेश आहे. अ‍ॅनिमिया हा विकार रक्ताल्पता, पंडूरोग, रक्त क्षीणता, अरक्तता या नावानेसुद्धा ओळखल्या जातो. या विकारामध्ये रक्तातील तांबड्या पेशीची संख्या कमी होते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. यावर औषधोपचार असला आरोग्याविषय खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)