शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाच पालिकांसाठी ७३६ जणांची उमेदवारी

By admin | Updated: October 30, 2016 00:45 IST

२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या

नगर पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी ५६, तर नगरसेवक पदासाठी ६८० नामांकनवर्धा : २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीकरिता नामांकन अर्ज दाखल करण्याचा शनिवार अखेरचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांसह अपक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर नामांकन दाखल करण्यात आले. वर्धा वगळता उर्वरित पाच नगर पालिकांमध्ये एकूण ७३६ नामांकन दाखल झाले. यात नगराध्यक्ष पदाकरिता ५६ तर नगरसेवक पदाकरिता ६८० नामांकन दाखल झाले. नामांकन दाखल करण्याकरिता आज सर्वच पालिका परिसरात इच्छुकांची समर्थकांसह झुंबड उडाली होती. वर्धा नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता अनेकांनी नामांकन दाखल केले. मात्र रात्री उशिरापर्यंत नेमके किती नामांकन दाखल झाले, याची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. हिंगणघाट नगराध्यक्ष पदाकरिता २६ तर नगरसेवक पदांकरिता ३०७ नामांकन दाखल झाले आहे. आर्वी नगराध्यक्षाकरिता ८ तर नगरसेवकाकरिता १०४, पुलगाव नगराध्यक्षाकरिता ८ तर नगरसेवकांकरिता १०२ नामांकन दाखल झाले आहे. देवळी नगराध्यक्षपदाकरिता ४ व नगरसेवक पदाकरिता ७२ नामांकन दाखल झाले आहे. राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देते याची प्रतीक्षा नागरिकांना होती. ही प्रतीक्षा आज संपली. वर्धा, देवळी व पुलगाव पालिकेत खा. रामदास तडस व आ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पालिका आवारात कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.(प्रतिनिधी) पुलगाव पालिका नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्जपुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक व समर्थकांची भाऊगर्दी झाली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी आज १०२ नामांकनपत्र दाखल करण्यात आले. सकाळी कार्यालय सुरू झाल्या पासून सर्व राजकीय पक्ष व अपक्षांकडून नामांकनपत्र दाखल करणे सुरू झाले. राज्यात सत्तारुढ प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपाने खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या उपस्थितीत वंदना गाते यांनी नामांकन दाखल केले. तर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष रमेश सावरकर, राजन चौधरी, अश्विन शाह यांच्या उपस्थितीत रंजना पवार यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सेनेकडून कविता सुनील ब्राम्हणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला., राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्याम देशमुख यांच्या उपस्थितीत वैशाली देशमुख यांनी नामांकन दाखल केले. बसपातर्फे वर्षा कुंदन जांभुळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकनपत्र दाखल केले. या व्यतिरिक्त नगराध्यक्षपदासाठी चंद्रकला डोईफोडे, संगीता रामटेके, छाया ओंकार धांदे, संगीता कादी यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले. नगरसेवक पदाकरिता भाजपा, सेना, बसपा व काँग्रेस या प्रमुख पक्ष व अपक्षासह १०२ नामांकनपत्र दाखल करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून राजकुमारी शाह, मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नायब तहसीलदार राठोड इत्यादिनी नामांकनपत्र स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)