शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

इतर जिल्ह्यातून आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठेवली जातेय पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकूणच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती सध्यास्थितीत निरोगी असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ४ हजार २१५, देवळी तालुक्यात १ हजार ६२२, आर्वी तालुक्यात १ हजार ९७९, सेलू तालुक्यात १ हजार ६७४, आष्टी तालुक्यात १ हजार २७९, समुद्रपूर तालुक्यात ९०८, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १५३ तर कारंजा (घा.) तालुक्यात १ हजार ७२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे.या सर्व व्यक्तींना १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने वर्धा तालुक्यातील २ हजार ७४१, देवळी तालुक्यात १ हजार ४६७, आर्वी तालुक्यात १ हजार ४९२, सेलू तालुक्यात १ हजार २४५, आष्टी तालुक्यात ९३५, समुद्रपूर तालुक्यात ८४८, हिंगणघाट तालुक्यात १ हजार २३३ तर कारंजा (घा.) तालुक्यात ५२० व्यक्तींना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सध्या एकूण ४ हजार ४२१ व्यक्ती गृहविलगिकरणात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्हगृहविलगिकरणात असलेल्या व्यक्तींपैकी ६१ व्यक्तींची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५६ व्यक्तींचा अहवाल जिल्ह्यातील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. तर पाच व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आलेल्या १४ हजार ९०२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारत त्याच्या घरावर सूचना फलक चिटकविण्यात आले आहे. या १४,९०२ व्यक्तींपैकी १०,४८१ व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षण नसल्याने त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या