शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

६९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

By admin | Updated: October 14, 2014 23:21 IST

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून चारही विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ६९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य

आज मतदान : १० लाख ४० हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्कवर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून चारही विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ६९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य १० लाख ४० हजार २४४ मतदार मतदानाचा हक्क बजावून ठरविणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून १ हजार ३०६ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी १ हजार २४३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गत निवडणुकीचा आधार घेत सर्वाधिक व सर्वात कमी मतदान झालेल्या मतदान ७८ केंद्रांना अंतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून जादा सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ४४ - आर्वी मतदार संघात १५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये आठ राजकीय पक्ष आणि सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे भवितव्य २ लाख ४८ हजार ५५१ मतदार ठरविणार आहेत.४५- देवळी मतदार संघात १० राजकीय पक्ष आणि नऊ अपक्ष असे एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. २ लाख ४७ हजार ८७९ मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. ४६-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये नऊ पक्षीय आणि पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेत. २ लाख ६० हजार ७०६ मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत.४७ - वर्धा विधानसभा मतदार संघात सर्वाधिक २१ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये १४ उमेदवार राजकीय पक्षाच्या तिकीटवर लढत असून सात उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. २ लाख ८३ हजार १०८ मतदार या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आपल्या मतांतून ठरविणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)