शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:22 IST

शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.

ठळक मुद्दे४ आॅगस्टपासून जैन मंदिरात आयोजन : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्रीजी म.सा. नवकार जपेश्वरी प.पू. शुभंकराश्रीजी म.सा., विद्याभिलाषी प.पू. ज्ञानोदयाश्रीजी म.सा., ज्ञानपिपासू प.पू. सिद्धोदयाश्रीजी म.सा. आदि ठाणा ४ यांचे आगमन झाले आहे.दरवर्षी चातुर्मासादरम्यान हा दरबार आयोजित केला जातो. जैनेतर शुद्धशाकाहारी इच्छुक व्यक्ती कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारणार्थ यात सहभागी होऊ शकतात. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कालसर्पयोग दोष निवारण व नवग्रह दोष निवारण अनुष्ठान, ५ ला सकाळी ९ वाजता अठरा अभिषेक व श्री नवकार दरबारात पार्श्वप्रभूंची स्थापना, ६ ला सकाळी ९ वाजता कुंभकलश व अखंड दीप स्थापना, नवग्रह दहा दिक्पाल अष्टमंगल स्थापना आणि त्यानंतर ६८ दिवसीय नवकार जापास प्रारंभ होणार आहे. नवकार दरबारात नवकार मंत्राचा सातत्याने जाप चालणार असून दरदिवशी सकाळी ८.१५ ते ९.१५ पर्यंत सामूहिकरीत्या जाप केला जाणार आहे. या दरम्यान प्रतिव्यक्ती कूपन दिले जाणार असून त्याची सोडत दरदिवशी सकाळी प्रवचनानंतर काढली जाणार आहे. सकाळी प्रवचनानंतर आणि सायंकाळी सामूहिक जापानंतर आरती होईल. याचा लाभ सोडतीनुसार दिला जाणार आहे, असे आयोजक अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष अनिल कोठारी, व्यवस्थापकीय विश्वस्त दिनेशकुमार कोचर, शिखरचंद मुनोत, शांतिलाल कोचर, प्रदीप कोठारी, अरूण कोचर, अशोक गांधी, हरीश कासवा यांनी कळविले आहे. श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टद्वारे आयोजित या कार्यक्रमात जैन समाजातील श्रावकांनी कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश कोचर यांनी केले आहे.हिंगणघाटातील तेविसावा नवकार दरबारसाध्वी मंडळाद्वारे चातुर्मासाच्या प्रत्येक ठिकाणी नवकार दरबाराचे आयोजन केले होते. भाविक दरबारात तासन्तास बसत नवकार मंत्राचा जाप करतात. हा नवकार दरबार तब्बल ६८ दिवस चालतो. मागील २२ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. दरबारात साध्वीजींनी सोबत आणलेली भगवान पार्श्वनाथ आणि अन्य देवता व गुरूदेवाची प्रतिमा स्थापित केली जाते. आतापावेतो २२ ठिकाणी हा दरबार घेण्यात आला. हिंगणघाट शहरातील हा २३ वा दरबार आहे.