वर्धा : लायन्स क्लबद्वारे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कृषी प्रकल्पांचा आणि भूमी परीक्षण सप्ताहचा समारोप डिस्ट्रीक्ट गव्हर्नर विजय पालीवाल यांचे उपस्थितीत घेण्यात आला. हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लि. नागपूर आणि कृषी विभागाचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अभिषेक बेद तर मार्गदर्शक म्हणून मुख्य विपणन प्रबंधक एन. के. कामत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद कुलकर्णी, मुख्य विपणन प्रबंधक एम. के. पाचारणे, झोन चेयरमन डॉ. अजय वाणे, कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, आत्माचे प्रकल्प संचालक दिपक पटेल उपस्थित होते.प्रोजेक्ट डायरेक्टर विश्वास भांबुरकर यांनी भूमी परीक्षण सप्ताहात १४ गावातील ५६० मातीचे नमूने प्राप्त झाल्याचे सांगितले. परीक्षण अहवाल पवनार येथील डॉ. नंदकिशोर तोटे यांच्या स्वाधीन करण्यात आले. रितुराज चुडीवाले, स्मिता बढीये, योगीता मानकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सचिव अनुराग पोद्दार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी लायनेस अध्यक्षा आस्था बेद, नौशाद बक्श, बाळासाहेब इंगोले, पी.पी. देशमुख, गिरीश उपाध्याय, प्रदीप दाते, रंजना दाते, नवीन चांडक, विलास जोशी, सुशील उमरे, आर.सी. एफ. चे जिल्हा प्रमुख विशाल मांजरेकर, उपप्रबंधक संजय बरडे तसेच लॉयन्स, लॉयनेस क्लब चे बहुसंख्य सदस्य आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
६५० मातीच्या नमुन्यांचे नि:शुल्क परीक्षण
By admin | Updated: June 2, 2016 00:45 IST