शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:50 IST

कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना : उर्जामंत्र्यांची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा

ऑनलाईन लोकमत वर्धा : कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. यामुळे जोडणी कपातीच्या संकटातून बचावाकरिता उर्जामंत्र्यांनी नवी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार तीन ते पाच हजार रुपये भरून जोडणी कायम ठेवण्यात येत आहे. या घोषणेचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ५९५ शेतकºयांना होणार आहे.शेतकºयांची थकबाकी ३० हजारांच्या आत असल्यास ३ हजार रुपये आणि ३० हजारांच्या वर थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. शिवाय बºयाच शेतकऱ्यांना त्यांच्या देयकाची दुरूस्ती करावयाची आहे. त्याकरिता १ ते ३० डिसेंबरपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. हा निर्णय होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जोडण्या कापण्यात आल्या आहेत. यापैकी जे शेतकरी रक्कम भरतील त्यांची कापलेली वीज तत्काळ जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना त्यांची देयके वाढीव आली आहे असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय होणार असलेल्या शिबिरात आपली तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे. या तक्रारीवर कारवाई करण्याकरिता विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण ६८ हजार १८० शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे. त्यांच्याकडे ६३ कोटी ८६ लाख ७१ हजार ८७३ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जून आणि मार्च महिन्यातील आहे. या दोन महिन्याच्या थकबाकीदारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणकडून मिळालेल्या माहितीवरून दिसत आहे. सध्या शेतकºयांच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कमही भरणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महावितरणने यातूनही शेतकºयांना सूट द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.