शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड तूर खरेदीपासून ६०० शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:56 IST

शासनाच्या नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत मंगळवारी संपली. यात सुमारे ६०० शेतकरी वंचित राहिले. बुधवारी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. या शेतकऱ्यांनी युवा सोशल फोरमला माहिती देताच जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देत चर्चा केली.

ठळक मुद्देयुवा सोशल फोरमकडे तक्रार : मुदतवाढीची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत मंगळवारी संपली. यात सुमारे ६०० शेतकरी वंचित राहिले. बुधवारी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. या शेतकऱ्यांनी युवा सोशल फोरमला माहिती देताच जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देत चर्चा केली. यात मुदतवाढ मिळवून द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.नाफेडने तूर खरेदीसाठी २२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी केली. यानंतर बरेच शेतकरी शिल्लक राहिल्याने नोंदणीस मुदतवाढ देत ती २३ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी नोंदणी केली; पण तूरीची खरेदी झाली नाही. नाफेडने शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत तूर खरेदी केली; पण तरीही तब्बल ६०० च्या वर शेतकरी शिल्लक राहिले. बुधवारी शेकडो शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. शिवाय अनेकांच्या तुरी घरीच आहेत. याबाबत युवा सोशल फोरमने बुधवारी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेत चर्चा केली. तूर खरेदीला मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून मंजूर करून घ्यावा, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नितीन झाडे, मिलिंद मोहोड, सुधीर पांगुळ, अ‍ॅड. गोडघाटे, मयूर डफळे, विवेक तळवेकर, सतीश लांबट व शेतकरी उपस्थित होते.