शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार बेरोजगारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:28 IST

बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरोजगाराचा प्रश्न बिकट : ४०,७६८ मुले तर १९,६२१ मुली

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे. या नोंदीवरून बेरोजगारांची फौज वाढत असल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी वर्षभरात ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंदणी झाली होती; पण प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरताना आढळतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची प्रतीक्षा करतात. हा विभागही सध्या हायटेक झाला आहे; पण सामान्य शेतकºयांच्या मुलापर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी दहावी, बारावी व पदवी घेणाºया युवकांच्यास संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचे दिसून आले आहे.तालुकास्तरावर घेतले जातात मेळावेजिल्ह्यातील बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. यात वर्धा, आष्टी, देवळी, हिंगणघाट येथील मेळाव्यात युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली. बेरोजगारांनी नोंदणी कार्डची वैधता संपल्यानंतर नुतनीकरण केले नाही. जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात गतवर्षी ८ हजार ८०६ बेरोजगारांची नोंद झाली होती. यात ५ हजार ३२० मुले तर ३ हजार ५०४ मुलींची नोंदणी झाली होती. यावर्षी एकूण ६० हजार ३८९ बेरोजगारांची नोंद झाली. यात मुलाची संख्या ४० हजार ७६८ तर मुलींची संख्या १९ हजार ६२१ आहे. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेतले असून २८१ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिकाधिक बेरोजगार उमेदवारांना सहज शक्य व्हावे म्हणून शासनाने आॅनलाईन अर्जाची सुविधा केली आहे. आमच्या विभागाद्वारे तालुकास्तरावर रोजगार मेळावे घेण्यात येतात. रोजगाराची सुविधा व्हावी यासाठीही आमचा विभाग प्रयत्नशील आहे.- दा.सी. कोसारे, वरिष्ठ लिपीक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा.