शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बस-कंटेनर अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी

By admin | Updated: September 9, 2016 02:15 IST

अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला.

अल्लीपूर : अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला. बसमधील चार प्रवाशांसह चालक व वाहक गंभीर जखमी झाले. हा अपघात वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येथे बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला. बसमधील १७ प्रवासीही किरकोळ जखमी असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांनी दिली. अकोला येथून हिंगणघाटकडे जाणारी बस क्र. एमएच ४० वाय ५८४९ ला विरूद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कंटेनर क्र. एमएच २९ सी २४० ने जबर धडक दिली. यात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात चालक राजेंद्र गाते, वाहक नरहरी जायभाये रा. हिंगणघाट, अफतरीन बानू करीम खान (६३), खुशल्या बानू मुस्तफा खान (५०), समरीया बानू खान (३०) सर्व रा. हिंगणघाट, संजय वामन चौरे (४०) शेगाव कुंड हे गंभीर जखमी झाले. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बसमधील मिलिंद हरिदास फुलझेले, असरीन फुलीशाह सैय्यदअली, स्वप्नील नवारकर, सुनील महाजन, नवीन ठाकूर, गिरीश गजबे सर्व रा. हिंगणघाट, प्रफुल्ल जरे समुद्रपूर, शहनाज बानो, नामदेव सातघरे रा. कोरेगाव, शखील खान (८) रा. हिंगणघाट, कवडू बावणे, गजानन कोपरकर, अमोल नौकरकर, करुणा बावणे रा. कोरेगाव, नानाजी चिमूरकर, प्रज्ञा मून, संगीता बावणे, अरुण देवतळे रा. हिंगणघाट अशी अन्य जखमींची नावे आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.(वार्ताहर)