शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५७ रिक्त पदांपैकी १६ पदे पदोन्नतीने भरा

By admin | Updated: July 18, 2016 00:34 IST

जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी संवर्गातून राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग-२ पदाच्या पदोन्नतीसाठी ५७ पदे मंजूर करण्यात आली आहेत;

कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी संवर्गातून राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग-२ पदाच्या पदोन्नतीसाठी ५७ पदे मंजूर करण्यात आली आहेत; पण मार्च २०१६ अखेर सदर ५७ पदांपैकी रिक्त झालेली १६ पदे पदोन्नतीने भरण्यात आली नाहीत. ती रिक्त पदे त्वरित भरण्याची कार्यवाही करावी यासह प्रलंबित मागण्यांकरिता जि.प. कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये जि.प. च्या कृषी अधिकारी संवर्गाला वर्ग-२ चा दर्जा द्यावा, विस्तार अधिकारी (कृषी) व विस्तार अधिकारी पंचायत संवर्गाप्रमाणे वर्ग-२ च्या पदोन्नतीसाठी मान्यता देत कार्यवाही करावी, याबाबत सचिव व अप्पर सचिव कृषी यांच्याकडे निर्णयासाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील कृषी अधिकारी यांच्या रोखण्यात आलेल्या पदोन्नती त्वरित द्याव्या, जि.प. कडून राज्य शासन कृषी विभागाकडे वर्ग झालेल्या योजना पुन्हा कृषी विभागाकडे द्याव्या, १९९८ पासून जि.प. च्या बऱ्याच योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहे. यामुळे जि.प. कृषी विभागाकडे पुरेशा योजना नाहीत. राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण, पॉली हॉऊस, सेडनेट आदी योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्या आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. याबाबत निर्णय न झाल्यास सर्व कृषी व विस्तार अधिकारी आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. म.रा. जि.प. कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना पुणे मार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत कृषी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला; पण शासनाने योग्य कार्यवाही करीत निर्णय घेतला नाही. याबाबत राज्य कार्यकारिणीची औरंगाबाद येथे सभा झाली. यात कृषी व विस्तार अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले. संघटनेच्या निर्णयानुसार वर्धा जिल्हा परिषदेतील सर्व कृषी व विस्तार अधिकारीही आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने प्रलंबित मागण्यांची दखल घेत कार्यवाही करवी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)