शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

आठ वर्षांत ५३ लाखांचा वृक्षकर

By admin | Updated: June 4, 2014 23:55 IST

सर्वत्र हिरवळ रहावी, वृक्षलागवड व्हावी याकरिता शासनाने प्रत्येक स्वायत्त संस्थेला शहरातील नागरिकांकडून वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार वर्धा नगरपरिषदेने वृक्षकराच्या नावावर

शहरातून हिरवळ बेपत्ता : पालिकेची कराच्या नावावर वसुली मात्र सुरू रूपेश खैरी - वर्धासर्वत्र हिरवळ रहावी, वृक्षलागवड व्हावी याकरिता शासनाने प्रत्येक स्वायत्त संस्थेला शहरातील नागरिकांकडून वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार वर्धा नगरपरिषदेने वृक्षकराच्या नावावर गत आठ वर्षांत तब्बल ५३ लाख ५३ हजार ९७७ रुपये वसूल केले. त्या तुलनेत शहरात वृक्षसंवर्धन सोडा वृक्षलागवडही झाल्याची नोंद पालिकेत नसल्याचे खळबळजनक वास्तव आहे. पालिकेच्यावतीने कधी वृक्षलागवड झाली नसल्याने आज शहरातून हिरवळ बेपत्ता झाल्याचे चित्र आहे.ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेत वाढ होत आहे. यावर आळा घालण्याकरिता वृक्षलागवड हा एकमेव मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शासनाने स्वायत्त संस्थांना त्यांच्या करआकारणीत वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना दिल्या. या करातून वसूल झालेल्या रकमेतून शहरात वृक्षांची लागवड करावी व त्यांचे संगोपन करावे अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार वर्धा नगर परिषदेच्या प्रत्येक महिन्याचा कर आकारताना त्यात वृक्षकर आकारण्यात येतो. तो नागरिकांकडून नियमित आकारण्यात वसूलही करण्यात येतो. वर्षाकाठी एकमुस्त कर आकारण्याचा सपटा पालिकेच्यावतीने करण्यात येत असला तरी त्यांच्याकडून त्या रकमेचा वापर दुसर्‍याच कामावर होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. येथील महिती अधिकार कार्यकर्ता नरेंद्र कांबळे यांनी ही माहिती अधिकाराचा वापर करून बाहेर काढली आहे. वृक्षकाराच्या नावावर वसूल केलेला कर वृक्षलागवड व त्याच्या संवर्धनाकरिता होणे गरजेचे आहे; मात्र वर्धेत तसे होताना दिसत नाही. शहराच्या सौदर्यीकरणाकरिता पालिकेच्यावतीने विविध उपाय योजना आखण्यात येत आहे; मात्र वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकरिता कुठल्याही उपाययोजना आखण्यात येत नाही. शहरातील मुख्य मार्गावर कुठेही सावलीकरिता माठे वृक्ष राहिले नाही. नागरिकांनी सावलीकरिता कुणाच्यातरी दुकानाचा वा घराचा आधार घ्यावा लागत आहे. असे असतानाही पालिकेच्यावतीने शहरात वृक्षलागवड मोहीम राबविल्या जात नाही.