शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५२ नवीन साठवण बंधारे

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये

वर्धा : जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत ५२ नव्या साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. या बंधाऱ्यासाठी अंदाजपत्रीय किमत सहा कोटी ५ लाख १६ हजार रुपये असून ३५९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.वर्धा तालुक्यात ११ बंधारे होणार आहे. यामुळे ९१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. यामध्ये पुलई, नेरी, अंबोडा, सालोड येथे दोन, जुगाधरी (लोन.), झाडगाव, बेलगाव, मदनी व तरोड्याचा समावेश आहे. या प्रत्येक बंधाऱ्यांची सिंचन क्षमता प्रत्येकी सात ते आठ हेक्टर शेतजमीनीची आहे.देवळी तालुक्यात आठ बंधाऱ्यामुळे ४२ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. यामध्ये येसगाव येथे दोन, लोणी, अडेगाव, आगरगाव, आकोली -२, काजळसरा या गावांचा समावेश आहे. यात इंझाळा गावाचा समावेश आहे; मात्र निवडलेले स्थळ त्रांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.सेलू तालुक्यातील झडशी, हेलोडी-२, हेलोडी(हिवरा-बोर)-२ व परसोडीचा समावेश आहे. यामध्ये २९ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. आर्वी तालुक्यातील बोथली-वर्धमनेरी, मार्डा व शहाबादपूरचा समावेश आहे. यामुळे १७ हेक्टरातील सिंचन अपेक्षितआहे.आष्टीतील पाचमध्ये साहूर, तळेगाव(श्या.), लहानआर्वी, सिंदीविहिरा व नरसिंगपूरचा समावेश आहे. यामुळे ३७ हेक्टर क्षेत्र सिंचित होणे अपेक्षित आहे. कारंजातील पाचमध्ये भालेवाडी-२, राहाटी-२, ढगा, चोपन, बेलगाव व सेलगाव(लवणे)-२ चा समावेश आहे. यामुळे ४५ हेक्टरातील सिंचन अपेक्षित आहे. हिंगणघाट तालुक्यात नऊ सावठण बंधारे होणार आहे. यामुळे हडस्ती, रोहणखेडा, वाघोली, शेगाव कुंड, फुकटा, गाडेगाव, भैय्यापूर, कानगाव, या गावांतील ५८ हेक्टर शेतजमीन सिंचित होणे अपेक्षित आहे. वेणी गावाचा समावेश आहे; मात्र निवडलेले स्थळ त्रांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील सहामध्ये वायगाव(हळद्या), नंदोरी, वाशी, रामनगर, बोथुडा व वडगावचा समावेश आहे. येथील ४० हेक्टर क्षेत्र सिंचित करण्याची क्षमता सदर बंधाऱ्यांची आहे.(जिल्हा प्रतिनिधी)