शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

जिल्ह्यातील ५१२ शिक्षक बदलीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रि या सुरू झाली असून खो पद्धतीने ५१२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रक्रियेला सुरुवात : आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सोमवारी संपली मुदत

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रि या सुरू झाली असून खो पद्धतीने ५१२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.शिक्षकांच्या बदलीतील भ्रष्टाचार संपवून पारदर्शक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील वर्षीपासून आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविली जात आहे. यावर्षी आचारसंहिता असल्याने बदली प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु आचार सहिंता संपात ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने महाराष्ट्रातून सर्वात प्रथम जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांचे मॅपिंग करून ४ जून रोजी आॅनलाईन मंजूर केले. तेव्हापासूनच शिक्षकांच्या बदलीकरिता आवेदनपत्र भरण्याची सुविधा ट्रान्सफर पोर्टलच्या शाळा लॉगिनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वात प्रथम संवर्ग-१ च्या शिक्षकांच्या अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तसेच संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांना बदलीकरिता अर्ज भरण्याची सुविधा ६ जूनला सकाळी ११ वाजतापासून उपलब्ध करून देण्यात आली. सवर्ग- १ ते सवर्ग-४ पर्यंतच्या सर्वच शिक्षकांना आपले आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० जूनला रात्री १२ वाजतापर्यंत देण्यात आली.त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, अशा सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता बदलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाचवी फेरी होणार आॅफलाईनसवर्ग-१, संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रि येनंतर पाचवी फेरी मुख कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नियंत्रणात आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. बदली पोर्टलमध्ये दहा वर्षे नोकरी झालेल्या आणि एकाच ठिकाणी कमीतकमी तीन वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांनाच बदलीस पात्र ठरविले जात असल्याने मागीलवर्षीच्या बदली प्रक्रियेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा अर्ज पोर्टल स्वीकारत नाही. म्हणून या अतिरिक्त शिक्षकांच्या पाचव्या फेरीत आॅफलाईन पद्धतीने बदली होईल.मागीलवर्षी बदली प्रक्रियेत ज्यांना मनाप्रमाणे शाळा मिळाल्या नाही, असे शिक्षक न्यायालयात गेले होते. त्या शिक्षकांचा निकाल लागला असून १४३ शिक्षक आता बदलीस पात्र आहे. त्या शिक्षकांचे पाचव्या आॅफलाईन फेरीत प्राधान्य दिले जाईल. आॅनलाईन प्रक्रिया आटोपल्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पसंतीनुसार शाळा दिली जाईल.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेही समुपदेशन करुन त्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. त्यांना पसंतीक्रम नसून नियुक्त केलेल्या ठिकाणीच जावे लागणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.बदली प्रक्रि येबाबत शिक्षकांची ओरड कायममागीलवर्षी झालेल्या बदली प्रक्रियेतील तक्रारीनंतर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. परंतु, न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर शासनाच्या आदेशावरच बोट ठेवत आदेशच अस्पष्ट असल्याने शिक्षकांवरील कारवाई टळली. आताही स्तनदा माता व गर्भवती शिक्षिकांचा संवर्ग-१ मध्ये समावेश करण्यात यावा, मागीलवर्षी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनाही या भरती प्रक्रियेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली. परंतु, शिक्षकांची बदली पोर्टल महाराष्ट्राकरिता एकच असल्याने यात स्थानिक पातळीवरून बदल करणे शक्य नसल्याचे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कार्यरत ५१२ शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मागील वर्षी न्यायालया गेलेले १४३ शिक्षक आणि मागीलवर्षी अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांना पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा नसल्याने त्यांच्या बदलीचे अधिकार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे पाचव्या आॅफलाईन फेरीत न्यायालयात गेलेल्या आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येईल.-डॉ. वाल्मिक इंगोले, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक वर्धा.