शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांत झाले मृत अविनाश भागवत जिवंत

By admin | Updated: March 8, 2017 01:25 IST

मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला.

बनावट कागदपत्रांवर शेती विक्री प्रकरण आर्वी : मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस काठडी ठोठावण्यात आली आहे. अटकेत असलेला प्रेम अमर टोनपे याने रोशन निमकर याच्याकडून ५० हजार रुपये घेवून यशवंत कदम याला तोतया अविनाश भागवत बनवल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे आर्वीत अवघ्या ५० हजारांत मृत व्यक्ती जिवंत झाल्याची चर्चा आहे. मृतक अविनाश भागवत यांच्या शेतीच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबई येथून प्रेम अमर टोनपे (४५) व त्याचा मावसा यशवंत गोविंदा कदम (६२) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्याकडून अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या आरोपींकडून विशेष माहिती अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या दिशने तपास सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस सुत्रानुसार, तोतया अविनाश भागवत बनविण्याचा व्यवहार रोशन निमकरने पे्रम टोनपे याच्याशी ५० हजारांत ठरविला होता. टोनपे याने नवी मुंबई येथील यशवंत गोविंद कदम याला तोतया अविनाश भागवत बनवून २१ जुलै २०१६ रोजी मुंबईवरून आर्वीला आणल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचदिवशी सहायक निबंधक यांच्या कोर्टात खोट्या स्वाक्षऱ्या करून हे दोघे मुंबईला १५ हजार नगदी घेऊन रवाना झाले. उर्वरीत ३५ हजार नंतर देण्यात येईल, असा व्यवहार झाल्याची कबुली टोनपे याने दिली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप हिवाळे, जमादार विनोद वानखेडे, अखिलेश गव्हाणे करीत आहे.(शहर प्रतिनिधी) दोन बँकांना घातला २९ हजारांनी गंडा अटकेतील दोघांकडून काही माहिती उजेडात आली असून मुख्य आरोपीने वर्धेच्या अ‍ॅक्सीस बँकेतून १२ लाख तर पुलगाव येथील आय.सी.आय.सी.आय. बँकेतून १७ लाखांच्या कर्जाची उचल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुलगाव येथे खोटे खरेदी दस्तावेज, सातबारा, आठ अ व अन्य कागदपत्र बँकेला पुरवून १७ लाखांच्या कर्जाची उचल केल्याचे तपसात समोर आले आहे.