शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार नागरिक ‘आधार’पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:16 IST

समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्देगिरड येथे केंद्रच नाही : तालुकास्थळावरील केंद्रावर येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. मागील दोन वर्षांपासून गावातील बंद केलेले आधार केंद्र पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करावे, या मागणीकरिता जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. प्रशासनाने समस्या लक्षात घेता गिरड येथे आधार केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.गिरड भागातील लाखो नागरिकांना आधार सुविधा देणारी आॅनलाईन यंत्रणा दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. परिणामी, गावखेड्यातील आॅनलाईन प्रशासकीय कारभार आॅफलाईन झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामासाठी आज आधार कार्ड गरजेचे असताना ते नव्याने काढणे आणि दुरुस्ती करणे जिकरीचे झाले आहे.सध्या तालुक्याच्या ठिकाणी एका आधार केंद्रावर ही सुविधा पुरविली जात आहे. पेठ, मोहगाव, आर्वी, तावी, फरीदपूर, वानरचुहा, केसलापार, रासा, पिपरी, पिंपळगाव, लोखंडी, साखरा, तळोदी, मंगरूळ, ताडगाव, दसोडा, गणेशपूर, उंदिरगाव, जोगीनगुंफा, शिवणफळ, अंतरगाव, घोरपड, सावंगी, वडगाव, धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, एदलाबाद, खुर्सार्पार, कवडापूर यासह दोनशेहून अधिक गावखेड्यांकरिता हे एकमेव केंद्र आधार ठरत आहे. यामुळेच नागरिकांना एकाच कामाकरिता वारंवार या केंद्रावर उंबरठे झिजवावे लागत आहे. या आधार केंद्रावर एका दिवशी केवळ ३० ते ३५ जणांचीच नोंदणी केली जाते. पयार्याने आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. शासकीय योजना, शिक्षण, बँक लिंक, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यावर पूर्ण जन्म तारीख नमूद असणे गरजेचे आहे. सुरुवातीला काढण्यात आलेल्या कित्येक आधार कार्डवर जन्मतारखेचा उल्लेख नाही.याशिवाय अनेकांच्या नावातही त्रुटी आहेत. त्या दुरुस्ती करणे गरजेचे असताना तालुक्यात एकच आधार केंद्र अस्तित्वात आहे.सध्या सुरु असलेल्या केंद्रावर आधार कार्डसंबंधित सर्व्हर सुरळीत नसल्याने नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहे. तर आधार पुनर्दुरुस्ती केल्यावरही दोन-दोन महिने आधार कार्ड मिळत नाही. शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर मिळालेल्या पैशाची उचल करणे, बँकेतून पन्नास हजारांवर पैशाची उचल करण्याकरिता पॅन कार्ड सोबतच आधारदेखील अनिवार्य आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, गिरड येथे तथा तालुकास्थळी समुद्रपूर येथे अतिरिक्त केंद्रे देण्यात यावी, अशी मागणी गिरडसह दोनशी गावांतील नागरिकांनी केली आहे.एकमेव केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक गावांचा भारसमुद्रपूर तालुक्यात सुरू असलेल्या सीएससी केंद्राला आधार केंद्र संलग्न करण्यात आले होते. याच केंद्रावर आधार कार्डसंबंधित साहित्य पुरविण्यात आले होते. प्रशासनाकडून कालांतराने हे साहित्य परत घेण्यात आले. सध्या समुद्रपूर येथे असलेल्या केंद्रावर संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यांचा भार आहे. या एकाच केंद्रावर मोठी गर्दी उसळते. या केंद्रावरही अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा विविध गावांतील नागरिकांचा आरोप आहे.शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार बंधनकारक आहे. अपुºया केंद्राअभावी वंचित राहावे लागत असल्याने सर्वच चिंतित आहेत.समुद्रपूर तालुक्यात पूर्वी पाच ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्यात आली होती. या आधार केंद्रामुळे नागरिकांची दस्ताऐवज मिळविण्यासाठीची प्रशासकीय कार्यालयात होणारी दिरंगाई आणि अतिरिक्त पैशाच्या भुर्दंड यापासून मुक्तता झाली. मात्र, काही दिवस सुरळीत चाललेले आधार केंद्र अचानक प्रशासनाने बंद केल्याने परिस्थिती ‘जैसे थे‘ झाली आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड