शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के थकीत वीज बिल माफ

By admin | Updated: July 12, 2014 23:50 IST

राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर केली आहे़ या योजनेच्या अंमलाकरिता महावितरणे पावले उचलेली आहेत़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थकित वीज बील ५० टक्के माफ केले जाणार आहे.

कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावनी सुरू गौरव देशमुख - वायगाव (नि.)राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर केली आहे़ या योजनेच्या अंमलाकरिता महावितरणे पावले उचलेली आहेत़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थकित वीज बील ५० टक्के माफ केले जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम तीन हप्त्यात भरण्याची सवलतही देण्यात आल्याची माहिती देवळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास नवघरे यांनी दिली. कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम एकरकमी वा तीन मासिक हप्त्यामध्ये भरली तर उर्वरित ५० टक्के मूळ थकबाकी रक्कम शासन भरणार आहे. महावितरणला विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरुपात अदा करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकित असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण माफ करणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे. योजनेतील अटी -सहभागी कृषी ग्राहकांना १ एप्रिल २०१४ नंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे व नियमित भरणे आवश्यक़ -जे ग्राहक ३१ मार्च २०१४ रोजी थकबाकीदार नाहीत, अशा शेतकऱ्यांना पूढील दोन त्रैमासिक बिलामध्ये ५० टक्के माफी़-जे ग्राहक योजनेत सहभागी होणार नाही, त्यांना अपात्र ठरविले जाईल व नियमाप्रमाणे व्याज व दंडासह पूर्ण रक्कम पुन्हा ग्राहकाच्या बिलात दर्शविली जाईल़-यात ५० टक्के बिल भरण्याचे हप्ते ३१ आॅगस्टपर्यंत बिलातील किमान २० टक्के, दुसरा हप्ता ३१ सप्टेंबरपर्यंत किमान २० टक्के व ३१ आॅक्टोबरपर्यंत उर्वरित रक्कम १० टक्के असे ५० टक्के भरावेल लागतील़ ५० टक्के रक्कम शासनाद्वारे अदा केली जाईल. -देवळी उपविभागांतर्गत वायगाव (नि.), भीडी, गिरोली, देवळीतील अर्बन व रूरल असे पाच झोन आहेत़ -कृषी ग्राहकांवर ३ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. ही योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्याची संबंधित ग्रा़पं़ माहिती देण्यात येणार आहे़