शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोविडचा बूस्टर डोस घेणाऱ्यांत 49.13 टक्के वयोवृद्धांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १० हजार ९२९ लाभार्थ्यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात आला असला तरी यात ४९.१३ टक्के वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. तर अनेक हेल्थ केअर अन् फ्रन्टलाईन वर्कर कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यास दुय्यम स्थानच देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोविड लसीचा बुस्टर डोस घेणाऱ्यांत ३ हजार ७५६ हेल्थ केअर वर्कर, १ हजार ८०३ फ्रन्टलाईन वर्कर तसेच तब्बल ५ हजार ३७० वयोवृद्धांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १० जानेवारीपासून वयोवृद्ध तसेच हेल्थ केअर आणि फ्रन्टलाईन वर्करला कोविड लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १० हजार ९२९ लाभार्थ्यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात आला असला तरी यात ४९.१३ टक्के वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. तर अनेक हेल्थ केअर अन् फ्रन्टलाईन वर्कर कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यास दुय्यम स्थानच देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोविड लसीचा बुस्टर डोस घेणाऱ्यांत ३ हजार ७५६ हेल्थ केअर वर्कर, १ हजार ८०३ फ्रन्टलाईन वर्कर तसेच तब्बल ५ हजार ३७० वयोवृद्धांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या कोविडची तिसरी लाट उच्चांक गाठत असून, लसीचा बुस्टर डोस हा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्तच असल्याचे सांगण्यात येते. 

का नाही घेतला बुस्टर?मागील काही दिवसांपासून कामाचा व्याप वाढला आहे. याच व्यस्ततेमुळे आपण कोविडचा बुस्टर डोस अद्यापही घेतला नाही; पण लवकरच आपण कोविड लसीचा बुस्टर डोस घेणार असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर आरोग्य यंत्रणेतील एका परिचारिकेने सांगितले.कोविडची दुसरी लाट उच्चांक गाढत असल्याने तसेच बदलत्या वातावरणामुळे रुग्ण तपासणीचे काम वाढले आहे. रुग्णसेवेला प्राधान्य दिले जात असल्याने आपण अद्याप कोविड लसीचा बुस्टर डोस घेतला नाही. लवकरच बुस्टर डोस घेऊ, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर आरोग्य यंत्रणेतील एका डॉक्टरने सांगितले.

लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोविडची प्रतिबंधात्मक लस किंवा लसीचा बुस्टर डोस हा कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मनात कुठलीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी. लस हा कोविड संकटात खबरदारीचा प्रभावी उपाय आहे.- डॉ. प्रवीण वेदपाठक,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस