शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

४७ आशा स्वयंसेविकांचा गौरव

By admin | Updated: April 8, 2015 01:47 IST

जागतिक आरोग्य दिन व बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७ आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.

वर्धा : जागतिक आरोग्य दिन व बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४७ आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य सुनिता ढवळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, डॉ. सोमलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेसरे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, डॉ. निमोदीया, डॉ. कुचेवार, डॉ. मोनिका चारमोडे, डॉ. रेवतकर यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना भेंडे यांनी बालआरोग्य अभियानांत वर्धा जिल्हा महाराष्ट्रातून अव्वल येण्याकरिता सामूहिक प्रयत्नाची गरज व्यक्त केली. तर मीना यांनी पुरस्कार मिळालेल्या आशांनी आता राज्य स्तरावर जिल्ह्याला नावलौकीक मिळून देण्याकरिता प्रयत्न करावे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले. संचालन चंद्रकांत शहाकार यांनी केले तर आभार डॉ. रेवतकर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सर्वांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी) पुरस्कार प्राप्त आशासेविका जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांत जिल्हास्तरीय प्रथम मंजू शेंडे व द्वितीय पारितोषिक अर्पना आटे यांना मिळाले. तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक कांचन सोमकुवर, शीतल लभाने, स्मिता वरखेडे, सिंधू मानकर, उज्ज्वला नाखले, वंदना नौकरकर, गीता नागोसे, मंगला मनोहर व द्वितीय पुरस्कार ज्योत्स्ना रासोकर, रेखा लोमडे, कुसुम नांदणे, अनिता चिकराम, मंगला भोगांडे, ज्योती वाघमारे, राजकन्या काटसरपे यांना प्रदान करण्यात आला.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील पारितोषिक रेखा बमनोटे, राणी मेढेकर, मिना पाटील, अर्चना कोल्हे, अर्चना दखने, संगिता बावणे, प्रतीभा वानखेडे, यमुना गाजरे, छबु नेहारे, सविता उईके, लता धवने, सुजाता भगत, गीता कांबळे, ममता खासरे, सारिका मसराम, सुनिता थुल, पंचशीला फुलमाळी, संगीता कोसमकर, सुलोचना सालोकर, प्रतीभा वानखेडे, अर्चना घुबडे, सविता वाघमारे, लता लुगसे, संगीता गोडघाटे, शोभा चरडे, उमा बिरहा, संध्या गांडोळे, आरोग्य सखी म्हणून महानंदा गोटे व द्वितीय मनोरमा चव्हाण आशा गटप्रवर्तक म्हणून प्रथम पुरस्कार सोनम वानखेडे, द्वितीय पुरस्कार ज्योत्सना कळसकर व तृतीय उज्ज्वला थुल यांना देण्यात आला.