शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

४,६१५ घरकुलांचे होणार बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:35 IST

प्रत्येकाला हक्काचे घर असावे या उद्देशाने शासनाच्यावतीने विशेष प्रवर्गातील नागरिकांकरिता घरकूल योजना राबविली.

ठळक मुद्दे२०११ मधील सर्वेनुसार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येकाला हक्काचे घर असावे या उद्देशाने शासनाच्यावतीने विशेष प्रवर्गातील नागरिकांकरिता घरकूल योजना राबविली. या योजनेत वर्धा जिल्ह्यात ४ हजार ६१५ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात १ हजार ६१५ घरे बांधण्यात आली तर उर्वरीत घरांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील बेघर असलेल्या किंवा कच्चे घर असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना व इतरांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबविल्या जात आहे. यात अनुसूचित जाती (एस.सी.) रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती (एस.टी.) रेषेखालील कुटुंबाना शबरी योजना व इतर कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजने अंतर्गत हक्काचे घरकूल बांधुन दिल्या जाते. २०१६-२०१७ या वर्षात ४ हजार ६१५ गरजूंना घरे बांधण्याचे उदिष्टये देण्यात आले होते. त्यात १ हजार १६० घरे गरजूंना बांधून देण्यात आले आहेत. तर ३ हजार ४५५ घरे बांधण्यात येणार आहे तर यातील घरे प्रगती पथावर असल्याची महिती आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती, बांधकाम विभाग यांच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात गत अनेक वर्षांपासून बेघर व कच्चे घर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील व इतर गरीब कुटुंबाना योजनेने हक्कांचे घरकूल दिले आहे. या योजनेतील अनुसूचित जाती (एस.सी.) रमाई आवास योजना ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात २९३ घरकूल पूर्ण झाले असून ४७३ घरांचे काम सुरू आहे.अनुसूचित जमाती (एस.टी.) शबरी योजना यात ३०२ घरकूल उदिष्टये देण्यात आली असून ३०२ मंजुरी झाली असून ११२ घरांचे कामे पूर्ण झाले आहे. तर १९० घरे बांधकाम बाकी आहे तर यात प्रगती पथावर आहे. तर इतर प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यात ३ हजार ५४७ घरकुलाचे उदिष्टये देण्यात आले आहे. यात मंजुरी सुद्धा झाली असून यसात ७५५ घरे बांधण्यात आली आहे. यात २ हजार ७९२ घरकूल कामे सुरू असून ते लवकरच पुर्णत्त्वास जाणार आहे.