शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांनंतर शहर विकास आराखड्याची जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:43 IST

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण देशात परिचित झालेल्या आष्टी शहराचा आराखडा नसल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती.

ठळक मुद्देसर्वे पूर्ण, अतिक्रमण काढणार : सर्वेक्षणावर ४८ लाखांचा खर्च

अमोल सोटे ।आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण देशात परिचित झालेल्या आष्टी शहराचा आराखडा नसल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने शहर विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी उपाययोजना करायला प्रारंभ केला. निविदा निघताच ती नाशिक येथील कंपनीला प्राप्त झाली. सदर कंपनीने गत दोन महिन्यामध्ये सर्व्हे करून आष्टी शहर विकास आराखडा तयार करून दिला आहे.१९७२ साली आष्टी शहरातील घरे, खाली जागा, शासकीय इमारती, रस्ते, सार्वजनिक स्थळांसह सर्व बाबी समाविष्ठ करून सर्व्हे केला होता. त्यावेळी आष्टी कारंजा (घाडगे) तालुक्यात समाविष्ट होता. एक गाव म्हणून अवघ्या १६ हजार मध्ये संपूर्ण मोजणीसह आराखडा तयार झाला होता. कालांतराने १९८४ साली आष्टीला तालुक्याचा दर्जा मिळाला. लोकसंख्या वाढल्याने शेतजमिनीचे ले-आऊट पडून विस्तार झाला. घरांची संख्या आणि अतिक्रमण झपाट्याने वाढले. सन २०१५ साली आष्टी नगरपंचायत झाली.त्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून कामे करण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. यासाठी ई-निविदा निघाली. नाशिक येथील अक्षय इंजिनिअर्स कंपनीला ४८ लाखांध्ये काम मिळाले. कंपनीचे व्यवस्थापक साहेबराव पवार यांनी २० कर्मचाºयांची चमू कार्यरत केली. शहराच्या प्रत्येक घराचा, खाली जागेचा, सार्वजनिक रस्ते, इमारती याचे मोजमाप केले. त्यानंतर उतार काढण्यासाठी कंटूर सर्व्हेही करण्यात आला. भूमि अभिलेख कार्यालयात असलेला जुना नकाशा गृहित धरून सर्व्हे झाला. यामध्ये नवीन विस्तार वाढला. त्याचाही समावेश करण्यात आला आहे. मूळ वस्तीमधील रस्त्यांवर असणारे अतिक्रमण काढण्यासाठी सीमा कायम करण्यात आल्या आहे.राष्ट्रीय महामार्गासाठी अतिक्रमण काढणारशहर विकास आराखड्यातील मोजणीमुळे राष्ट्रीय महामार्गासाठी जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. बसस्थानकाच्या परिसराला लागून असणारे सर्व दुकाने हटणार आहे. न्यायालय इमारत बांधकाम सुरू आहे. त्यांच्याही समोरील दुकाने हटणार आहेत.बाकळी नदीचे पात्र कायम राहणारबाकळी नदीच्या भागात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी पात्र अरूंद आहे. या झालेल्या सर्वेक्षणामध्ये नदीचे पात्र कायम राहणार आहे. त्यामुळे शेतजमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.कंटूर सर्व्हे करण्यात आल्याने चढ-उतारावरील जमिनीची पातळी निश्चित झाली आहे. आष्टी हे उंच भागावर असलेले शहर आहे. वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. शहराच्या तीन बाजुला उंच टेकड्या आहेत. मुळ वस्ती उंचावर आहे. काही भाग उतार आहे. कंटूर सर्व्हेमुळे पाईपलाईन टाकताना मदत होणार आहे.