शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंद संकेतस्थळामुळे 4,458 गरजू स्वस्त धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार १८० शिधापत्रिकाधारक असून, यावर तब्बल ११ लाख ३१ हजार ४६१ व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी नवीन शिधापत्रिका प्राप्त करू इच्छिणाऱ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवेदकाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. पण ज्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांना नोंद करावी लागते, तेच संकेतस्थळ मागील महिनाभरापासून बंद असल्याने तब्बल ४ हजार ४५८ गरजूंचे अर्ज धूळखात आहेत. शिवाय ते स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. सदर समस्या तातडीने निकाली निघावी म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा येथील काही अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई दरबारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पण केवळ वातानुकूलित कक्षात बसून आपणच सर्व कामे करतो, असा आव आणणारे हे अधिकारी सध्या केवळ आश्वासनच देत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. 

नागरिकांना झिजवावे लागतेय शासकीय कार्यालयांचे उंबरठे-    ऑनलाईन पद्धतीने नोंद घेणारे संकेतस्थळ बंद असले तरी नागरिकांच्या अडचणीत भर पडू नये, म्हणून तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात नवीन शिधापत्रिकेबाबतचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पण संकेतस्थळ सुरू झाले काय याची विचारणा करण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठेच झिजवावे लागत असल्याचे वास्तव आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हतबल नागरिकांचा रोष-   संकेतस्थळ आज सुरू झाले असावे, या आशेने तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात येरझारा मारणाऱ्यांत वृद्धांचीही  मोठा संख्या असून संकेतस्थळच बंद असल्याने सध्या त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - नाहक त्रास सहन करून हतबल झालेले नागरिक सध्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मुंबई दरबारातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटच मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

आपण आवश्यक कागदपत्रे संलग्न करून नवीन शिधापत्रिकेसाठी रीतसर अर्ज केला आहे. पण ऑनलाईन नोंद घेण्यासाठीचे संकेतस्थळच बंद असल्याने ते सुरू झाल्यावर नोंदणी होईल असे सांगण्यात आले. नागरिकांची समस्या लक्षात घेता अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष देत समस्या निकाली काढावी.- राखी वरभे, अर्जदार.

संकेतस्थळ बंद असून ऑनलाईन पद्धतीने नोंद घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. शिवाय पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.- प्रज्वल पाथरे,  पुरवठा अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Governmentसरकारgovernment schemeसरकारी योजना