शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८८ विद्यार्थ्यांकरिता ४.४० लाख

By admin | Updated: July 4, 2016 01:36 IST

चिमुकल्यांत विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांची संशोधक वृत्ती जोपासल्या जावी याकरिता केंद्र ..

इन्स्पायर्ड अवॉर्डचे आॅनलाईन अर्ज : प्रतिकृतीकरिता अनुदान मंजूररुपेश खैरी वर्धावर्धा : चिमुकल्यांत विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांची संशोधक वृत्ती जोपासल्या जावी याकरिता केंद्र शासनाकडून जिल्हास्तरावर ‘इन्स्पायर्ड अवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शन घेण्यात येते. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची प्रतिकृती तयार करण्याकरिता पाच हजार रुपये देण्याचा नियम आहे. यानुसार या सत्रात होणाऱ्या प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील काही शाळांनी आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. यातील काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ८८ बालवैज्ञानिकांना त्यांची प्रतिकृती तयार करण्याकरिता प्रत्येकी पाच हजार असे एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारे इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रदर्शन जाहीर होताच प्रतिकृतीकरिता असलेले पाच हजार रुपये देण्यात येते. यातील ५० टक्के रक्कम प्रतिकृतीकरिता तर उर्वरित रक्कम विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकाला विज्ञान प्रदर्शनातील सहभागावर खर्च करावयाचे आहे. यंदाच्या इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. आॅगस्ट महिन्याच्या १५ तारखेपूर्वी ते घेण्याच्या सूचना आल्या आहेत. यंदाच्या अवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन वर्धा व नागपूर या दोन जिल्ह्याच्या संयुक्त सहभागातून करण्याच्या सूचना आहेत. यामळे जिल्ह्यातील काही शाळांनी या प्रदर्शनात सहभागी होण्याकरिता आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यातील ८८ विद्यार्थ्यांचा या अवॉर्ड करिता प्रवेश पक्का झाला आहे. विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात गोडी निर्माण होण्याकरिता प्रोत्साहन म्हणून ही रक्कम देण्यात येते. यात विद्यार्थ्यांने त्याच्या आवडीचा प्रयोग सादर करावा, त्याची कल्पना मांडावी असा आहे. मात्र त्यांना मिळणाऱ्या पाच हजार रुपयांकरिता अनेकांकडून दुकाने थाटण्यात आली आहे. काही शिक्षकांच्या माध्यमातून तयार प्रतिकृती देऊन ती प्रदर्शनात ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मूळ उद्देशाला बगल मिळत असल्याचे बोलले जात आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचे इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शन यंदा नागपुरात यंदाच्या शैक्षणिक सत्रात होणार असलेली विज्ञान प्रदर्शन दोन जिल्हे मिळून होणार आहे. यात वर्धा व नागपूर या दोन जिल्ह्याचे एकीकरण करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ आॅगस्ट पूर्वी घेण्याच्या सूचना आल्या आहेत. दोन गटात होणार असलेल्या या प्रदर्शनात शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे कळविण्यात आले आहे. यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शाळांतील ८८ विद्यार्थ्यांचा प्रवेश पक्का झाला असून इतर शाळांना प्रदर्शनाची माहिती देण्याच्या सूचना आहेत.