शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४१८ हातपंप उन्हाळ्यात सोडतात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:16 IST

नागरिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी हातपंप उभे केले.

ठळक मुद्दे४,७६१ हातपंप : पाणीच नसल्याने ठरतात कुचकामी

रूपेश खैरी ।ऑनलाईन लोकमतवर्धा : नागरिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी हातपंप उभे केले. यातील बहुतांश हातपंप नाममात्र असून तब्बल ४१८ हातपंप ऐन उन्हाळ्यात जीव सोडत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्यावतीने केलेल्या सर्व्हेत उघड झाले आहे. ऐन पाणी टंचाईच्या दिवसात हातपंप कोरडे पडत असल्याने त्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाण्याकरिता नागरिकांची होणारी भटकंती रोखण्याकरिता हातपंप देण्याचा शासनाचा निर्णय होता. हा हातपंप देण्याकरिता शासनासह लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदार संघात हातपंप देण्याची मुभा देण्यात आली. याकरिता त्यांना विशेष निधीही देण्यात आला. या निधीतून या लोकप्रतिनिधींनी मागेल त्या गावात हातपंप दिले. यातून पाण्याची समस्या मिटेल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गावाकºयांच्या सोईकरिता नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोईकरिता हातपंप दिल्याचे दिसून आले.या प्रकारातून जिल्ह्यात एकूण ४ हजार ७६१ हातपंप उभे झाले. गाव, तांडा, बेघर वस्ती, बसस्थानक असो की शहरातील वॉर्ड वा गल्ली या ठिकठिकाणी हातपंप देण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात अनेक सार्वजनिक ठिकाणी हातपंप लावण्याचा सपाटा सुरू झाला तो आजही सुरूच आहे; पण त्याला आजस्थितीत काही प्रमाणात ब्रेक बसल्याचे दिसत आहे. पाणी टंचाई निवारण्याकरिता हातपंप देण्यात येत असताना ऐन उन्हाळ्यात ते कोरडे पडत असल्याने हे हातपंप कुचकामी पडत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.उन्हाळ्याच्या दिवसात गावातगावात असलेले पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले की या हातपंपावर गर्दी होते. मात्र ज्यागावात टंचाई आहे अशा गावातील अनेक हातपंप ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आटत आहेत. यामुळे हे हातपंप गरजेच्यावेळी कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. उन्हाळ्यापुर्वी हे हातपंप जीव सोडत असताना त्यांच्या दुरूस्तीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.एकूण २९९ हातपंप कायमस्वरूपी बंदविविध ठिकाणी असलेल्या एकूण हातपंपांपैकी तब्बल २९९ हातपंप कायमस्वरूपी बंद पडले आहेत. बंद पडलेल्या हातपंपाचे सांगाडेही बेपत्ता झाले आहेत. या पंपांच्या पाईपला शासनाच्यावतीने गोल पट्टी लावून बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी शाखेच्यावतीने सांगण्यात आले आहे.४०४६ हातपंपांना बारमाही पाणीजिल्ह्यात असलेल्या हातपंपांपैकी एकूण ४ हजार ४६ हातपंपांना बारमाही पाणी असल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पंपांप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या सर्वच हातपंपांना उन्हाळ्याच्या दिवसातही पाणी असावे याकरिता शासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे.टंचाई आराखड्यातील खर्चानंतरही हातपंप कोरडेचगावागावांत निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई निवारण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात येतो. असे असतानाही हे हातपंप दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात कोरडे पडण्याचा प्रकार वर्षानुवर्षे कायम राहत आहे. यामुळे हा निधी नेमका कोणत्या कामांवर खर्च होतो, याचा शोध जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेण्याची गरज आहे. यातून मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.