शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

३८ हजार नागरिक आजारी

By admin | Updated: January 24, 2016 01:54 IST

नागरिकांमध्ये आपल्या आरोग्यबाबत जागृती नाही, हे वास्तव आहे. आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाही ...

आरोग्य जनजागृती अभाव : उच्च रक्तदाब, कर्करोग, लकव्याचा समावेशगौरव देशमुख वर्धानागरिकांमध्ये आपल्या आरोग्यबाबत जागृती नाही, हे वास्तव आहे. आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाही जिल्ह्यातील ३८ हजार ५२१ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यात उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग आणि लकव्याच्या आजाराचा समावेश आहे.नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेण्याकरिता राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम २०११ मध्ये सुरू करण्यात आला. यात ९ लाख ४२ हजार ७७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात वर्धा जिल्ह्यात २०११ ते २०१५ पर्यंत सुमारे ३६ हजार ६९६ (हायपर टेंशन) बीपीचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार पुर्णत: अनुवांशिक नसला तरी थोडाफार अनुवांशिकता असणे नाकारता येत नाही. आरोग्य विभागामार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजारांची मोफत तपासणी केली जाते.१ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत उच्च रक्तदाबाचे १५ हजार ८४३ रुग्ण आढळून आलेत. यात ६ हजार ९८६ पुरूष तर ८ हजार ८५७ महिला रुग्ण असल्याचे समोर आले. हृदय व धमन्यांच्या आजारामध्ये ४४९ रुग्ण आढळून आलेत. यात पुरूष २१० तर महिला रुग्ण २३९ आहेत.पक्षाघात (लकवा) या आजारात ५६७ रुग्ण आढळून आले आहे. यात पुरूष २८० तर महिला रुग्ण २८७ आहेत. कर्करोगामध्ये विविध प्रकार आहेत. महिलांच्या कर्करोगात स्तन, गर्भाशय, गर्भमुख व तोंडाचा कर्करोग आहे. कर्करोगाचे १४३ रुग्ण असून पुरूष ६२ तर ८१ महिला रुग्ण आहेत. नागरिक धकाधकीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे आजार कायम स्वरूपी ठिक होत नसले तरी आटोक्यात अणण्याचा प्रयत्न करता येते. यासाठी आरोग्य विषयक जनजागृती गरजेची आहे.चार वर्षांत ९.४२ लाख रुग्ण तपासणीआॅगस्ट २०११ ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत ९ लाख ४२ हजार ७७७ नागरिकांच्या प्राथमिक तपासणीत ४ लाख १४ हजार ४३ पुरूषांची तर ५ लाख २८ हजार ७३४ महिलांची तपासणी करण्यात आली. यात उच्च रक्तदाबाचे ३६ हजार ६९६ रुग्ण असून १८ हजार ३६५ पुरूष व १८ हजार ३३१ महिला आहेत. हृदयरोग व धमन्यांचे आजार ८४२ रुग्ण असून ४७२ पुरूष व ३७० महिला आहेत. धकाधकीच्या युगात नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तपासणीत उच्च रक्तदाबाचे संशयीत म्हणून ५० हजार ३ रुग्णांची, हृदयरोग व धमन्यांच्या आजारात संशयीत ८७५, लकवा या आजाराचे ७३० रुग्ण असून संशयीत ७८४ आहे. कर्करोगाचे २५३ रुग्ण असून संशयीत १ हजार ६१८ असल्याचे अहवालात नमूद आहे.नागरिकांनी शासनामार्फत होणाऱ्या विविध शिबिरांचा लाभ घ्यावा. तपासणी करावी. हे रोग बरे होणारे नसले तरी यावर विशेष काळजी घेतली तर आटोक्यात आणता येतात. शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. - डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.अशा आजारांबाबत आमच्या विभागामार्फत औषधोपचार व तपासणी नि:शुल्क केली जाते. नागरिकांनी पुढाकार घेत वर्षातून एकदा तरी तपासणी करणे आवश्यक आहे.- तृप्ती देशमुख (वरखेड), औषध निर्माण अधिकारी प्रा. आ.कें. मांडगाव