शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ३८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:36 IST

सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे.

ठळक मुद्दे१.८० लाखांचा दंड वसूल : रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मागील तीन दिवसात ४४ वाहनांची तपासणी करून ३८ वाहनचालकांवर कारवाई केली. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.वाहतूक नियमांना बगल देणाऱ्यांवर सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून कारवाई केली जात आहे. मागील तीन दिवसात उपप्रादेशिक परिवहन विभागाने ४४ वाहने तपासली. शिवाय वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºया चौघांवर, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१ जणांवर, अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्याने नऊ वाहनचालकांवर आणि आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा केल्या प्रकरणी चार आॅटोचालकांवर कारवाई केली आहे. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.४० वाहनांना लावले ‘रिफ्लेक्टर’सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर असणे गरजेचे आहे. परंतु, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे निदर्शनास आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत सुमारे ४० वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे. शिवाय वाहतूक नियमांना बगल दिल्याचे निदर्शनास असल्याने रापमच्या बसचालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस