शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:34 IST

धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो.

ठळक मुद्देतीन महिन्यात होतो तक्रारींचा निपटारा : ९० टक्के तक्रारकर्त्यांचे समाधान

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो. नागरिकांच्या चांगुलपणाचा फायदा घेत फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील अनेक तक्रारी ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे पोहोचत असून जुलै अखेरपर्यंत ३ हजार ८३८ तक्रारी पैकी ३ हजार ६६९ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.प्राप्त माहितीनुसार, २० लाखापर्यंतचे प्रकरण तक्रार निवारण न्याय मंचाच्या कार्यकक्षेत येतात. तर २० लाखांच्यावर आणि एक कोटी पर्यंतचे खटले राज्य आयोग तसेच एक कोटीच्या वरचे खटले राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकक्षेत येतात. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाला न्यायालयाचा दर्जा असून दोन्ही बाजुंचा युक्तीवाद लक्षात घेवून येथे प्रकरण निकाली काढले जाते. बँक, रेल्वे, विमा, टेलीकॉम, पोस्ट, बिल्डर्स व सोसायट्या, विद्युत वितरण, घरगुती साहित्य खरेदी, शिक्षण तसेच इतर स्वरुपाचे खटले ग्राहकांचे हित जोपासणे या उद्देशाला केंद्र स्थानिक ठेवून चालविले जातात. येथे दाखल झालेल्या खटल्याचा तिन महिन्यातच न्यायनिवाडा करुन प्रकरण निकाली काढली जात आहेत.मंचाच्या स्थापनेपासून २०१७ च्या जुलै अखेरपर्यंत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात ३ हजार ८३८ खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ६६९ खटले निकाली काढण्यात आले आहेत. तर १६९ खटले प्रलंबित आहेत. मंचाकडे प्राप्त झालेले प्रकरण तीन महिन्यात निकाली निघत असल्याने सदर मंच ग्राहक हित जोपासण्यासाठी फायदाचा ठरत आहे.