शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर विद्यार्थ्यांची भेट

By admin | Updated: November 9, 2016 01:02 IST

स्थानिक आर.के. हायस्कूल येथील शारदा सभागृहात १९८२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा : आर.के. हायस्कूलचा उपक्रमनाचणगाव : स्थानिक आर.के. हायस्कूल येथील शारदा सभागृहात १९८२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुनर्भेट सोहळा आयोजित करण्यात आला होता. वयाची पन्नाशी गाठलेले त्यावेळेचे विद्यार्थी अचानक झालेल्या पुनर्भेटीने गहिवरून गेले. याप्रसंगी त्यांना विद्यादानाचे कार्य केलेल्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. प्रशासकीय, व्यापार, उद्योग अशा विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी एक विलक्षण आनंद याप्रसंगी उपभोगत होते. अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल तर अतिथी म्हणून प्रमिला नकाशे, रमेशचंद्र बदनोरे, अवथनकर, बोराडे, भट्टड, कोठावळे, देशमुख, लोणकर, व्यास, सुदामे हे शिक्षक उपस्थित होते. त्या वेळचे विद्यार्थी व सध्या महसूल उपायुक्त असलेले जितेन पापडकर म्हणाले की, या गुरुजनांनी शिकविलेल्या ज्ञानामुळे आज या पदापर्यंत पोहोचलो. त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही. ग्रामीण भागासाठी कार्य करणे व त्या माध्यमातून समाजसेवा आपल्या हाताने घडावी, शासकीय योजनांचा अधिकाधिक सामान्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला.माजी प्राचार्य रमेश बदनोरे यांनी हा पुनर्भेट नसून आनंद सोहळा असल्याचे सांगितले. पंखामध्ये बळ येईपर्यंत पक्षी घरट्यात राहतात व एकदा बळ आले की, ते उडून जातात; पण हे ३५ वर्षानंतर परत आलेले विद्यार्थी पाहून खरा आनंद झाला, असे सांगितले. लोणकर, अवथनकर, नकाश, अग्रवाल यांनीही भावना व्यक्त केल्या. अशोक नंदेश्वर यांनी गायलेली कविता जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली. प्रास्ताविक अविनाश शहागडकर यांनी, संचालन धमेंद्र अंबादे यांनी केले तर आभार राजेश जुनोनकर यांनी मानले. कार्यक्रमाला राजेश भंसाळी, आनंद जीवणे, अशोक नंदेश्वर, रवी पतालिया, प्रमोद नितनवरे, पनपालिया, ज्योत्स्ना कंटाळे, सहारे, सोनी, ठोंबरे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)