शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो.

ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रम। उमरेड-पवनी-कºहांडलाची जाणली इत्थंभूत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. पण याच व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेला लागून असलेल्या गाव शिवारात नेहमीच मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होतात. हाच अनुचित प्रकार टाळता यावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेवरील गावांमधील काही निवडक नागरिकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उमरेड-पवनी-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या गावांत भेट देऊन वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष माहिती घेतली.चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा दूवाच ठरतो. याच परिसरात वन्यजीव आणि मानव संघर्ष टळण्यासाठी ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत विविध प्रकारचे कामे करण्यात आली आहेत. ती अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. या अभ्यास दौऱ्यात वर्धा जिल्ह्यातील सदर ३५ व्यक्तींनी तेथील मनोरा गाव येथील रेशीम उद्योग, सोलरकुंपन, जीम, गांडूळ खत प्रकल्प, १०० टक्के कुºहाड बंदी, १०० टक्के एलपीजी वितरण, गावांमधील बोलक्या भिंती, सौर कंदील आदी कामांची माहिती जाणून घेतली. शिवाय वन्यजीव संगोपनासाठी नेहमीच सहकार्य करू अशी शपथ घेतली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेली चमू शुक्रवारी रात्री वर्धेत परतली.अभ्यास दौऱ्यादरम्यान उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथील सहाय्यक वनसंरक्षक अजीत साजणे, उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी निंबेकर, कुहीचे धनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक निलेश वाडीघरे यांनी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या ३५ व्यक्तींना विविध विषयांची माहिती दिली. शिवाय वन्यजीवांचे महत्त्व पटवून दिले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या रानवाडी येथील २०० हेक्टरवरील गवत कुरण प्रकल्पाचीही माहीती देण्यात आली. वनविभागाने हा उपक्रम आयोजित केला होता.

टॅग्स :forest departmentवनविभाग