लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सडक सुरक्षा...जीवन रक्षा या ब्रीद वाक्याला सार्थकी लावण्याचा प्रयत्न सध्या वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही विभागाने वर्धा-नागपूर मार्गावरील पवनार शिवारात नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावर काही दिवसांमध्ये सतत अपघात झालेत. यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. वाहन चालविताना सदर व्यक्तींनी हेल्मेटचा वापर न केल्याचेही या दोन्ही विभागांच्या लक्षात आल्याने या मार्गावर हेल्मेट सक्तीबाबतची ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम सतत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
वर्ध्यात ४८ तासांत ३३० दुचाकीचालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 15:30 IST
नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे.
वर्ध्यात ४८ तासांत ३३० दुचाकीचालकांना दंड
ठळक मुद्देहेल्मेटचा वापर न करणे भोवलेवाहतूक पोलीस व आरटीओची कारवाई