शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

३३ ग्रामपंचायती झाल्या १०० टक्के हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 13, 2016 01:24 IST

गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य

आष्टी (शहीद) : गावांतील आरोग्य कायम टिकून राहावे आणि महिलांच्या सुरक्षित धोरणाचा भाग म्हणून राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी १२ हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले. जिल्हास्तरीय पथकाद्वारे याची पाहणी करण्यात आली. यात तालुक्यात आजपर्यंत ३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, पं.स. गटविकास अधिकारी अनिल गावंडे, विस्तार अधिकारी पंचायत कैलास वानखडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी पी.एस. चव्हाण, जिल्हा प्रकल्प समन्वयक सचिन खाडे, पं.स. सभापती अर्चना राहाटे, पं.स. सदस्य विजय वांगे, दुर्गानंद डोळस, माधूरी बुले, सरपंच सुनीता जोरे तळेगाव, वनीता केवटे थार, वनीता लवणकर साहुर, तारा खुवशे माणिकवाडा, धुर्वे किन्हाळा, ग्रामविकास अधिकारी शिवदास रेवस्कर, विनोद राठोड, रमेश सावरकर, चेतन मुंढे, प्रियंका राऊत आदी उपस्थित होते. यावेळी गावांत गृहभेटी देत शाळांमध्ये मुलांना शौचालयावर मार्गदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणे, घाण करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ (कखग), ११७ अंतर्गत अपराध सिद्धीनंतर १२०० रुपये दंड व कारावासाची शिक्षा होणार असल्याची माहिती तपासणी पथकाचे प्रमुख मेश्राम यांनी दिली. आष्टी तालुक्यातील ४१ पैकी ३१ ग्रामपंचायती १०० टक्के पूर्ण झाल्या. २ ग्रामपंचायती आॅफलाईन असून ३३ गावे हागणदारीमुक्त आहे. उर्वरित ८ गावे महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गृहभेटीमध्ये शासनाने प्रकाशित केलेल्या तीनही स्टीकरची अंमलबजावणी करण्यात आली. यात शौचालय बांधकाम पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांच्या घरावर ‘लय भारी’चे हिरवे स्टिकर, शौचालय बांधकाम केले; पण वापर केला नाही, अशांना ‘जरा जपून’चे पिवळे तर ज्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवातच केली नाही, अशांच्या घरावर ‘खतरा/धोका’ नावाचे लाल स्टिकर लावण्यात आले. घरोघरी स्टिकर लावल्याने गावात चर्चेचा विषय रंगला होता.(तालुका प्रतिनिधी) अनुदानानंतर जागृतीची गरज ४शासनाने शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी बारा हजार रुपयांचे अनुदान दिले. असे असताना बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत असून गृहभेटी देत जनजागृतीद्वारे लोकांना प्रोत्साहीत करावे लागत आहे. ४आष्टी तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.