आयोगाचे पत्र : २५ जुलैला होणार मतदानवर्धा : जिल्ह्यात आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी आयोगाचे पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. या पत्रानुसार जिल्ह्यात ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका २५ जुलै रोजी होऊ घातल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमातील टप्पा क्र. १ नुसार आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस मुंबई ग्रामपंचायतीच्या नियमान्वये आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियमानुसार नमुना निवडणुकीची नोटीस २५ जून रोजी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिली आहे.(शहर प्रतिनिधी)
३१ च्या सार्वत्रिक, तर ४२ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका
By admin | Updated: July 2, 2015 02:26 IST