तीन लाखांवर नागरिकांची तपासणी : ‘सीडी फोर’ चाचणी किट जिल्ह्यात अनुपलब्धगौरव देशमुख वर्धाऔषधांच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात पाच वर्षांत एड्सच्या एकूण ३ हजार १६८ रुग्णांची नोेंद झाल्याची माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात ३ लाख १२ हजार १९० युवक, युवती व गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. यात २११ गरोदर मातांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एचआयव्ही चाचणी, समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००९-१० ते २०११-१२ पर्यंत एड्स रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. २००९ च्या पूर्वी एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी असल्याची नोंद शासन दरबारी आहे. २००९-१० मध्ये एड्सबाधित रुग्णांची संख्या तब्बल ७१९ असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ मध्ये एड्सचे ५९६ रुग्ण, २०११-१२ मध्ये ५५० रुग्ण, २०१२-१३ मध्ये ४३४ रुग्ण, २०१३-१४ मध्ये ३६८ रुग्ण, २०१४-१५ मध्ये २४७ रुग्ण तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात २५४ एड्सग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत ४२ हजार ९२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात २५४ नागरिकांना एड्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. या काळात १९ हजार ८४९ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात १५ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. २००९ ते २०१४ पर्यंतच्या तुलनेत २०१५ या वर्षात एड्स रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. एचआयव्ही एड्सबाधित रुग्णांची संख्या कमी करण्याकरिता जनजागृती हाच उपाय आहे. यामुळे शासनाने जनजागृती व औषधी पुरवठा वाढविणे गरजेचे आहे. अमरावती येथे करावी लागते तपासणीएड्स रुग्णांमध्ये पांढऱ्या रक्तपेशी ३५० वा कमी-अधिक असल्याची तपासणी करावी लागते. या तपासणीसाठी लागणारी ‘सीडी फोर’ नामक किट वर्धा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. ही किट नसल्यामुळे एड्स रुग्णांच्या पांढऱ्या पेशी तपासयच्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘एक्यूटी’ तपासणी केल्यास पांढऱ्या रक्तपेशी स्थायी राहतात; पण सीडी फोर किटच जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे जीवन अंधारात असल्याचे चित्र आहे.ही किट नसल्यास तपासणी करणे शक्य होत नाही. परिणामी, अमरावती येथून सदर रुग्णांच्या रक्तपेशींची तपासणी करून घ्यावी लागते. जिल्ह्यात गोळ्यांचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.
पाच वर्षांत ३१६८ एड्स रुग्णांची नोंद
By admin | Updated: December 28, 2015 02:14 IST