शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भंगारातून पालिकेला ३.१५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:31 IST

भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेतून निविदा : अहवालापेक्षा दहा हजार मिळाले अधिक

महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले.भंगार विक्री प्रक्रियेत पाच इच्छुकांनी भाग घेतला होता. सुनील नारायण लोखंडे आर्वी यांनी ३ लाख १३ हजार, मोसीन स्ट्रील ट्रेडर्स नागपूर ३ लाख ११ हजार, फोर स्टार स्क्रॅप यवतमाळ ३ लाख ७ हजार तर एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांनी ३ लाख १५ हजरांची बोली नमूद केली होती. सर्वाधिक बोली नमूद केल्याने एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांना पालिकेच्यावतीने भंगार विक्री करण्यात आली आहे. सदर भंगार विक्रीतून नगर पालिकेला ३ लाख ५ हजार रुपयांची मिळकत मिळेल, असा अंदाज होता; पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान दहा हजार रुपये अधिक मिळाल्याचेही पालिकेद्वारे सांगण्यात आले.वाहन विक्रीतून ५ लाख ८३ हजारांची मिळकतवर्धा न.प.ने भंगार झालेल्या व त्यांच्याकडे धूळखात पडून असलेल्या चार ट्रकसह एक अग्निशमन बंबाची रीतसर निविदा बोलवून ५ लाख ६३ हजारांत विक्री केली. या लिलाव निविदा प्रक्रियेत एकूण २९ इच्छुक सहभागी झाले होते. सदर भंगार वाहनांचे मूल्यांकन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले होते. १ लाख ६३ हजार न.प.ला मिळावे, असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता; पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगार गाड्यांची ५ लाख ६३ हजारांत विक्री झाल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.यापूर्वी मिळाले १ लाखवर्धा न.प. ने २००८-०९ मध्ये यापूर्वी भंगार विक्री केली होती. त्यावेळी साहित्य विक्रीतून नगर पालिकेला १ लाख रुपये प्राप्त झाले होते, असे सांगण्यात आले.९० कंटेनरसह विविध साहित्याची विक्रीपालिकेच्या कामात न येणाºया व धूळखात पडून असलेल्या काही साहित्याची न.प. ने यंदा विक्री केली. यात मोडके कचऱ्याचे ९० कंटेनर, दोन लहान कचरा ट्रॉली, तीन वॉटर टँक, दोन ट्रॉली आणि रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेली १ टन वजनाच्या जुन्या जाळीचा समावेश आहे. या संपूर्ण साहित्याची मूल्यमापन करून विक्री करण्यात आली आहे.बांधकाम विभागाकडून केले मूल्यांकननगर परिषदेच्या मालकीचे असलेले आणि उपयोगात येणार नसलेले विविध साहित्य भंगारात टाकून विकल्यास त्याची किती रक्कम मिळायला पाहिजे याचे मूल्यांकन न.प. अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले. ३ लाख ५ हजार रुपये सदर साहित्याचे मिळतील, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पालिकेला दिला होता; पण प्रत्यक्षात लिलावानंतर पालिकेला १० हजार अधिक प्राप्त झालेत.