शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नव्याने लागणार ३० सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: July 8, 2016 02:02 IST

सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आजच्या घडीला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी डोळे मिटले आहे.

जुने सीसीटीव्ही कॅमेरे बंदच : ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त वर्धा : सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आजच्या घडीला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी डोळे मिटले आहे. या जागी नवे कॅमेरे लावण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील ५० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातून शहरात एकूण ३० ठिकाणी नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. रक्कम पडून असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. नव्या कॅमेऱ्यांना अद्यापही निविदेचीच प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर्वी नाका, बजाज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. सदर कॅमेरे तत्कालीन जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रायोजकत्त्वावर लावले होते. या कॅमेऱ्याच्या दुरूस्तीसंदर्भात कुठलेही प्रावधान नसल्याने ते आता बंद पडले आहेत. शहरातील रस्त्यांवरील हालचाली टिपण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असल्याने पोलीस विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती मागणी मंजूर करण्यात आली होती. यातील ५० लाख रुपये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. यातून नवे कॅमेरे खरेदी करण्यात येणार असून ते शहरातील ३० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यात शहरातील मोठ्या चौकांसह शहराच्या सिमांवरही या कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. शहरात सध्या लागून असलेले कॅमेरे जर सुरू होत असतील तर तेही दुरूस्त करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. कॅमेरे खरेदीकरिता निविदा काढण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून कॅमेऱ्यांची खरेदीही लवकरच करून ते ठरलेल्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)जुन्या कॅमेऱ्यांच्या दुरूस्तीची तरतूद नाहीशहरात वाढत असलेल्या मंगळसूत्र चोरीवर आळा घालण्याकरिता मुख्य चौकात प्रायोजकत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. ते कॅमेरे आता बंद पडले आहेत. त्यांच्या दुरूस्तीकरिता शासनाकडे कुठलेही अनुदान नसल्याने आता नवे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. नव्या योजनेनुसार शहरात ३० ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार असून त्या दिशेने पोलीस विभागाचे कार्य सुरू आहे. मंजूर निधीपैकी ५० लाख रुपये पोलीस विभागाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार कॅमेरे खरेदीकरिता आवश्यक प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कॅमेरे लावण्यात येईल.- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा.