शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे.

ठळक मुद्देआर्वी मार्गाचे रुंदीकरण ठरतेय व्यर्थ : दुभाजक बसविण्याकरिता कंत्राटदाराला सापडेना मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता आर्वी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र उद्देशच सार्थ होत नसल्याचे चित्र आहे. एकूण चाळीसपैकी तीस फूट मार्गाला अतिक्रमणाने विळखा घातलेला असतो. परिणामी, दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडतात.छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जुनापाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. आर्वी नाका चौक ते जुनापाणी रस्त्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. तब्बल ३५ कोटी रुपये या मार्गाच्या बांधकामावर खर्ची घालण्यात आले. मात्र, संपूर्ण बांधकाम नियोजनाच्या अभावातच पार पडले. रस्ता बांधकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. पक्षपात करीत अतिक्रमणकर्त्यांना अभय देण्यात आले. अद्याप रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक आणि रहिवाशांचे अतिक्रमण कायम असल्याने रस्ता रुंदीकरण खरेच झाले काय, असा प्रश्न पडतो. सायंकाळी एकेरी रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो. यातच भाजी-फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने, यामुळे येथे दररोज वाहतूकव्यवस्था कोलमडते. त्यातच मोकाट जनावरांनी काही दिवसांपासून शहरातील विविध मार्ग आणि चौकात ठिय्या देणे सुरू केले आहे. या मार्गावरही मधोमध जनावरांचा मुक्काम असतो. त्यामुळे अद्याप वाहतुकीला मोकळा श्वास घेता येत नसल्याचे चित्र आहे. रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे. कित्येक दिवसांपासून करून ठेवलेल्या खोदकामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकामात असा अनागोंदी कारभार सुरू असताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचीही या प्रकाराला मूकसंमती दिसून येत आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास जाऊन कित्येक महिने लोटले. मात्र, अद्याप दुभाजक बसविण्यात आले नाही.आर्वी नाका चौकात अतिक्रमणछत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाक्यापर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. दुसºया बाजूने काम केले जात आहे. यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण एकाच मार्गावर आहे. असे असताना चौकातील इटनकर पान पॅलेस, चहाटपऱ्यांसमोर अवैधरीत्या तासन्तास वाहने उभी दिसतात. यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.मोकाट जनावरांची धरपकड कधी?शहरातील विविध मार्ग आणि चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असून नागरिकांना त्यांनी अक्षरश: वेठीस धरले आहे. रहदारीला नित्याने अडथळा निर्माण होत असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, नगरपालिकेने अद्याप जनावरांची धरपकड सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे.फेरीवाल्यांवर कारवाई व्हावीआर्वी मार्गावर सायंकाळनंतर हातगाडीच्या माध्यमातून फळ, भाजी विकणाºयांकडून अतिक्रमण केले जाते. खरेदीकरिता ग्राहकही गर्दी करतात. ग्राहक वाहनेही हातगाडीपुढेच उभे करतात. यामुळे या मार्गावरील वाहतूक असुरक्षित झाली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण