शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपारीचे ६५ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:11 IST

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांच्यावतीने वेळोवेळी प्रयत्न केले जातात. शिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ व ५७ अन्वये एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्याच्यावतीने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

ठळक मुद्देशिक्कामोर्तब करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांच्यावतीने वेळोवेळी प्रयत्न केले जातात. शिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ व ५७ अन्वये एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्याच्यावतीने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्यानंतर विभागीय न्याय दंडाधीकारी तथा उपविभागीय अधिकारी त्यावर शिक्का मोर्तब करतात. असे असले तरी मागील साडेतीन वर्षांच्या काळात पोलिसांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी तब्बल ६५ प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने विविध कारवाई केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ व ५७ अन्वये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला जातो. शिवाय तो उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यामार्फत पाठविल्या जातो. २०१६ मध्ये मपोकाच्या कलम ५६ अन्वये हद्दपारीबाबतचे ७ प्रस्ताव तयार करून ते उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यापैकी ३ प्रस्ताव खारीज करण्यात आले असून चार प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१७ मध्ये कलम ५६ अन्वये १६ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी तीन खारीज तर सहा प्रस्ताव मंजुर करण्यात आले. तर सात प्रस्ताव प्रलंबित आहेत. याच वर्षी कलम ५७ अन्वये पाच प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी एक प्रस्ताव पारीत झाला असून चार प्रस्ताव प्रलंबित आहेत. २०१८ मध्ये कलम ५६ अन्वये तीन प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी एक खारीज करण्यात आला तर दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत. शिवाय याच वर्षी कलम ५७ अन्वये हद्दपारीचे सात प्रस्ताव सादर करण्यात आले होते. हे सातही प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच २०१९ मध्ये १२ आॅगस्टपर्यंत कलम ५६ अन्वये ३८ प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यापैकी दोन प्रस्ताव खारीज करण्यात आले असून ३६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. याच वर्षी कलम ५७ अन्वये पाच प्रस्ताव सादर करण्यात आले होते. हे पाचही प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.मपोका ५५ अन्वयेच्या प्रस्तावाला एसपी देतात हिरवी झेंडीमपोकाच्या कलम ५५ अन्वये गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते. सदर प्रस्तावावर शिक्का मोर्तब करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षकांना असतो. २०१६ मध्ये पाच पैकी तीन प्रस्ताव, २०१७ मध्ये आठ पैकी पाच, २०१९ मध्ये सहा पैकी तीन प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी पारीत केले आहे.एमपीडीएअंतर्गत तिघांना केले कारागृहात स्थानबद्धअट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडून तयार करून तो जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांना सादर केला जातो. त्यावर जिल्हाधिकारी शिक्का मोर्तब करीत असून यंदाच्या वर्षी सदर कायद्यान्वये दोघांना तर गत वर्षी एकावर कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे....तर होते हद्दपारांवर कारवाईहद्दपारीच्या कालावधीत सदर व्यक्ती शहरासह जिल्ह्यात दिसला तर त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. स्थानिक गुन्हे शाखा किंवा पोलीस स्टेशन स्थरावरून ही कारवाई केली जाते.विशेष म्हणजे शहरात आणि जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी गुन्हेगारांवर पोलिसांकडून ही कारवाई केली जाते.

टॅग्स :Policeपोलिस