शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत २९ किमी भूमिगत तारमार्गाचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:36 IST

संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.

ठळक मुद्देरामदास तडस : आयपीडीएस योजनेतून १० कोटींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.केंद्र शासन पुरस्कृत इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतील १० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यांच्या हस्ते या कामांचा मुहूर्त साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुचिता मडावी, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, बांधकाम सभापती सारिका लाकडे व कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे उपस्थित होते.विकास कामात शहरातील ११ के.व्ही. वाहिनी, नवीन ट्रान्सफार्मर, भूमिगत केबलींग तसेच एलटी वाहिनी आदी कामे घेण्यात आली. आधी अस्तित्वात असलेल्या दोन पॉवर ट्रान्सफार्मरच्या क्षमतेत वाढ करून ते ५ एमव्हीएऐवजी १० एमव्हीए करण्यात आली. तसेच १४.५ किमी अंतराच्या ११ के.व्ही. उपरी तारमार्ग वाहिणीच्या बांधकामात बकाने ले-आऊट, मुक्ताईनगर, साईनगर, लक्ष्मीनारायण नगर, खाडे ले-आऊट, इंदिरा नगर मोठी आई, डिगडोह रोड, नांदोरा रोड तसेच औद्योगिक वसाहतीतील ३३ केव्ही ते यशोदा नदी आदी परिसराचा समावेश करण्यात आला. ११ केव्ही भूमिगत वाहिणीच्या ५ किमी अंतरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोलीस ठाणे, आचार्य डीपी, फरस, राहुल काशीकर, गोपाल दुधडेअरी, दत्त चौक, इंदिरा गांधी पुतळा, बसस्थानक आदी मार्गाचा समावेश करण्यात आला. नवीन १६ रोहित्र तसेच १२ किमी अंतराच्या लघुदाब वाहिनीचे काम हाती घेतले आहे. कार्यक्रमाला न.प. सदस्य नंदू वैद्य, सुनीता ताडाम, संगीता तराळे, अब्दुल नईम, श्रीकांत चाफले, अभियंता सुदेश होले तसेच महावितरणचे आणि न.प. कर्मचारी उपस्थित होते.