शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वर्धेतील २,७९७ जोडप्यांनीच केली विवाह नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:41 IST

नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या नियमांकडे पाठ : विवाहित मुलींच्या दृष्टीने नोंदणी महत्त्वाचीच

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्यांनीच आतापर्यंत विवाह नोंदणी केल्याची नोंद स्थानिक न.प. प्रशासनाने घेतली आहे.विवाह नोंदणी संदर्भात पारदर्शकता यावी यासाठी काही नियमावली लादण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबतचा ठोस निर्णय झाल्यास नवीन नोंदणीसाठी नवविवाहितांना फरफटच करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. आधार कार्ड सारखे सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र सरकारने सक्तीचे केले नसले तरी विविध कामांसाठी त्याची गरज भासत असल्याचे वास्तव आहे. पासपोर्टसह विविध कामांसाठी सदर प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे असतानाही शहरी भागातील अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी विवाह नोंदणीला फाटाच देत असल्याचे दिसून येते. विवाह नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असली तरी तरुण मंडळींकडून ती किटकच असल्याची बोंब ठोकली जात आहे. नवविवाहित मुलींच्या दृष्टीने सदर नोंदणी महत्त्वाचीच आहे.नावातील बदलासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यकलग्नानंतर मुलीचे नाव व आडनाव बदलते. लग्नानंतर मुलीच्या बदललेल्या नावाची विविध कागदपत्रांवर दुरूस्ती करून घेणे यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक व महत्त्वाचेच ठरते. त्यामुळे प्रत्येकाने विवाहानंतर विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे.विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रेविवाह नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबतचे शपथपत्र किंवा निबंधकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.वर व वधूचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहनचालविण्याचा परवाना, वयोमर्यादेकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विद्युत किंवा टेलिफोनच्या देयकाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे.लग्नाची पत्रिका व पत्रिका नसल्यास १०० रुपयांचे शपथपत्र, लग्नाचे छायाचित्र आवश्यक आहे.वधू व वराचे पाच तसेच साक्षीदारांचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, साक्षीदारांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच वधू किंवा वर घटस्फोटीत असल्यास त्याचा आदेश, वधू किंवा वर विधवा, विधूर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच न.प.मालमत्ता कर भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.