शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी नाचणगावला २.७० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:28 IST

महाराष्ट्राची भूमी ही किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, कोरीव बांधकाम यांनी संपन्न आहे. ही महाराष्ट्राची ही संपदा कायम राहण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला.

ठळक मुद्देभोसलेकालीन सराई आणि इसाई माता मंदिराचा होणार जीर्णोद्धार

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव/पुलगाव : महाराष्ट्राची भूमी ही किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, कोरीव बांधकाम यांनी संपन्न आहे. ही महाराष्ट्राची ही संपदा कायम राहण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला. यात वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथे असलेल्या भोसलेकालीन सराई आणि इसाई माता मंदिराच्या जिर्णोद्धाराकरिता २.७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाचणगाव येथील ऐतिहासिक भोसलेकालीन सराय ही ४०० वर्षांपुर्वींची वास्तू आहे. या ठिकाणी भोसलेकाळात सैनिकासोबत घोडदळाचाही मुक्काम येथे असायचा. काही काळाने या वास्तुचे संवर्धण करणे कठीण झाले होते. ती वास्तू मोडकळीस आली. या पुरातन वास्तुचे जतन व्हावे यासाठी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर व देवळी पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी पर्यटन मंत्री मदन येरावार यांना सदर वास्तुची माहिती दिली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी या पुरातन सरायना विषयक पाठपुरावा केला. तसेच विदर्भातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले नाचणगाव इसामाता मंदिराच्या विकासाचा प्रश्नही मांडला. शेवटी पर्यटन मंत्रालयातर्फे भोसलेकालीन सरईला १ कोटी ८० लाख व इसाई माता मंदिराला १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती बकाने यांनी दिली.या पत्रकार परिषदेला प्रवीण सावरकर, किशोर गव्हाळकर यांची उपस्थिती होती. तसेच प्राथमिक निधीचे वितरणही संबंधित विभागाला केले असल्याचे सांगितले. यामध्ये जुन्या बांधकामाची देखभाल, पथपद, स्टोन पेव्हींग, आकर्षक प्रवेशद्वार, विद्युतीकरण, प्लंबींगण वॉल कंम्पाऊंड याचा समावेश आहे.यावेळी ओंकार राऊत, राहुल चोपडा, दीपक फुलकरी, जयंत ओक, रमेश निंबाळकर, प्रेम साहू, संतोष तिवारी, सचिन कासार उपस्थित होते. याविषयी बोलताना प्रवीण सावरकर यांनी या कामाला जयंत येरावार तसेच सरपंच सविता गावंडे, उपसरपंच सुरेश देवतळे, पंचायत समिती सदस्य दिलीप अग्रवाल, मंगेश झाडे, प्रेम साहू व सर्व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यटन विभागाचे आभार मानले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथम वेळेस पर्यटनाचा निधी नाचणगावला येण्याचा ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.ऐतिहासिक असलेल्या या इमारतीच्या संवर्धनासाठी गावातील नेत्यांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. आता ती मागणी पूर्णत्त्वास गेली. याकरिता मोठा निधी आल्याने या इमारतीचा कायापालट होणार आहे. तसे त्याचे ब्लू प्रींटही तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी भाजपाच्यावतीने देण्यात आली आहे.