शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार तूर उत्पादकांचे २६.५० कोटी थकले

By admin | Updated: June 19, 2017 01:07 IST

मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर

हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : मान्सून दारात आहे. आर्थिक विवंचनेत पेरणी करण्याचे संकट घोंगावत असताना तालुक्यातील ४ हजार तूर उत्पादकांचे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांचे चुकारे शासनाकडे अडकले आहेत. त्यांना थकीत चुकाऱ्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तुरीला मिळालेल्या उत्तम दरामुळे गत हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले होते. परंतु शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर उत्पादक अडचणीत आला. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच भाव गडगडले. व्यापारी हमी भावापेक्षा हजार रुपये कमी दराने तुरीची खरेदी करीत होते. यामुळे होणारी लुट टाळण्याची मागणी करीत शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली. यात शासनाने आपण शेतकऱ्यांच्या पाठशी आहो, असे दर्शवित ३ जानेवारी २०१७ पासून २२ एप्रिल पर्यंत नाफेडच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली. यात तालुक्यातील २ हजार ४७८ शेतकऱ्यांकडून नाफेडने ४२ हजार ४७१ क्विंटल तुरीची खरेदी केली; परंतु विविध कारणांनी ही तूर खरेदी रखडल्याने योजना बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून आला. मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर राज्य शासनाने बाजारात तूर असलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिले. या पद्धतीने २३ एप्रिल ते ६ जून पर्यंत खरेदी केली. या पूर्वी शासनाने नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून येथील ३ हजार ३९८ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ५५९.५८ क्विंटल तूर खरेदी केली. परंतु चुकारे मात्र २० एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचेच देण्यात आले. यामुळे तालुक्यातील जवळपास ४ हजार शेतकऱ्यांचे २६ कोटी ५० लाख रुपयांचे तुरीचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत. शेती हंगाम सुरू झाला आहे. बँका कर्ज देत नाही, सावकारांनी शासन बडग्याची मोठी धास्ती घेतली आहे, अशा स्थितीत तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांकरिता आधार असताना शासन सुद्धा दगा देत आहे. त्यामुळे आता पर्याय काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.