शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

२,५३१ आॅटोंची विना परवाना प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:52 IST

जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे२,९०० आॅटोंनाच प्रवासी परवाना : उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे. या आॅटोतून प्रवास करणे अवैध असून वाहतूक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या आॅटोचालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्याकरिता एक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.अवैधपणे चालणाºया रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे पूर्णता: बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास अशी वाहतूक मुळातच बेकायदेशीर असल्याने प्रवासी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग आॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.बसस्थानक असो वा रेल्वे स्थानक या ठिकाणाहून प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविण्याकरिता आॅटो चालकांना परवाना देण्यात आला आहे. वर्धेत असा परवाना धारक आॅटोचालकांची संख्या २ हजार ९०० एवढी आहे. या आॅटो चालकांकडून दूरचे प्रवासी नेण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे. शहरात मात्र खासगी आॅटो चालकांकडून प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे.या मोहिमेत केवळ आॅटोच नाही तर इतर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत आॅटो चालकांना त्यांचा खासगी वाहनाचा परवाना रद्द करून तो प्रवासी वाहनाचा करण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.नव्या आॅटोंना मुभा, जुन्यांना दंडउप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आॅटो चालकांना काही शुल्क भरून त्यांचा परवाना प्रवासी करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. ही मुभा केवळ नवीन आॅटो चालकांना देण्यात आली आहे. जुन्या आॅटो चालकांना मात्र दंड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.यापूर्वी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने अशीच मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत काही आॅटो चालकांनी त्यांचा परवाना बदलवून घेतला आहे. यामुळे इतर आॅटो चालकांनी आपला खासगी परवाना बदलवून घ्यावा.अवैधपणे चालणाऱ्या आॅटो रिक्षांमधून प्रवासी वाहतूक बेकायदेशीर आहे. अशा वाहनास अपघात झाल्यास प्रवाशी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. यासाठी अवैध आॅटो रिक्षातून प्रवास करणे नागरिकांनी टाळावे. यासाठी जिल्ह्यात खाजगी संवर्ग अ‍ॅटोरिक्षा अवैध प्रवासी वाहतूक तपासणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.- विजय तिराणकर, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा.