शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दयालनगरात २४ लाखांची घरफोडी

By admin | Updated: November 28, 2015 03:03 IST

घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दयाल नगर परिसरातील हिराणी यांच्या घरी घडली.

रोख व सोन्याचे दागिने लंपास : बंद घरातून पळविला ऐवजवर्धा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दयाल नगर परिसरातील हिराणी यांच्या घरी घडली. या घटनेत चोरट्याने घरातून १८ लाख रुपयांची रोकड व ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २४ लाख रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वर्धा-देवळी मार्गावरील दयालनगर भागात धर्मदास व प्रेमचंद हिराणी हे दोन भाऊ एकाच इमारतीत राहतात. नुकतेच त्यांनी घराला नवीन रूप देण्यासाठी काम सुरू केले. सध्या त्यांच्या घरातील फर्निचरचे काम सुरू आहे. मुलीचे लग्न असल्याने हिराणी कुटुंबीय बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून जळगाव येथे गेले. आलीशान असलेला बंगला कुलूपबंद अन् परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराला मधोमध असलेले कुलूप सोबत आणलेल्या साहित्याने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तळ मजल्यातील शयनकक्षात प्रवेश करीत लाकडी आलमारीचे कुलूप तोडून साहित्यांची फेकफाक केली आणि आलमारीतील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पहिल्या मजल्यावरील शयनकक्षात प्रवेश करून तेथीलही लाकडी आलमारीतील साहित्याची फेकफाक करून रोखसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरला. शुक्रवारी सकाळी हिराणी कुटुंबीय घरी परतले असता सदर घटना घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे हे देखील चमुसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची निरखून पाहणी केली. पोलिसांच्या प्रथम पाहणी दरम्यान दीड लाखांची रोकड व काही सोन्याचे दागिने घटनास्थळीच दिसून आले. घटनास्थळी पोलिसांना देण्यात आलेली चोरीच्या साहित्याची माहिती व तक्रार करतेवेळी फिर्यादीकडून तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या माहितीत तफावत आल्याने शहर पोलिसांनी तक्रारकर्त्यांकडून पुन्हा तक्रार लिहून घेतली. यात या घरातून रोख १८ लाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २४ लाखाचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४७० आणि ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)