शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२३३ वाहन चालकांचा परवाना केला निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:54 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : वाहतुकीचे नियम न पाळणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क २३३ बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहे.दुचाकी प्रवासादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे. परंतु, पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षकांची खांदेपालट झाल्यापासून हेल्मेट क्रमप्राप्त मोहीम थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते आहे. परंतु, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी हेल्मेटचे महत्त्व आणि दुचाकी चालकाची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटचा वापर न करणाºया १८४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी सहा वाहनचालकांचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी निलंबित केला आहे. चारचाकीसह जड वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर न करताना आढळून आल्याने सहा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करताना १७ वाहनचालक आढळून आल्याने त्यांच्याकडून २ हजारांचा दंडा आकारण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी ११७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ४८ वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जादा साहित्य भरून वाहतूक करणे हा कायदेशीर गुन्हाच आहे. परंतु, अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी ४०२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १६८ वाहनचालकांची परवाने निलंबित करण्यात आले आहेत. धोकादायक वाहतूक प्रकरणी नऊ जनांवर कारवाई करून १८ हजारांचा दंड वसूल करून आठ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.पथकाकडून या गोष्टींची होतेय तपासणीसुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केला की नाही.वाहनचालविताना वाहनचालकाने सिटबेल्ट लावला की नाही.कुठला वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतो काय.वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन तर चालवित नाही ना.वाहन चालकाजवळ विमा आहे की नाही तसेच कुठला वाहनचालक अवैध प्रवासी वाहतूक तर करीत नाही.