३४ सावकार : ३४४ शेतकऱ्यांना लाभ वर्धा: शासनाने जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफीवर जिल्ह्यात काम सुरू आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३४४ शेतकऱ्यांना ३६ लाख १७ हजार ५६५ रुपयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात यापूर्वीही शेतकऱ्यांना माफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हा प्रशासनाकडे सावकारी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे सुरू केले आहे. यात समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार काम अर्जाची चौकशी सुरू आहे. यात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. सभेत एकूण ३४४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. वर्धा, समुद्रपूर, देवळी, हिंगणघाट व आर्वी येथील शेतकऱ्यांनी घेतलेल्या २९ लाख ७४ हजार ४५६ रुपयांच्या कर्जमाफीच्या प्रकरणांची दखल घेण्यात आली. या रकमेवरील व्याज म्हणून ६ लाख ४३ हजार १०९ रुपये असे एकूण ३६ लाख १७ हजार ५६८ रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रकरणाची चौकशी करून त्यातून प्रकरणे मंजूर करण्यात येत आहेत. यात अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समितीकड
आत्मघाती हल्ल्यात पाकमध्ये २३ ठार
By admin | Updated: December 30, 2015 02:39 IST