शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी २,२८८ मतदान यंत्र सज्ज

By admin | Updated: October 11, 2014 02:03 IST

विधानसभा निवडणुकीकरिता १ हजार ५०९ कंट्रोल युनिट व २ हजार २८८ बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

वर्धा : विधानसभा निवडणुकीकरिता १ हजार ५०९ कंट्रोल युनिट व २ हजार २८८ बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मतदानासाठी सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी एन. नवीन सोना यांनी मतदान यंत्रांची तपासणी तसेच मतदान यंत्र सिल करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करून संपूर्ण मतदान यंत्राच्या सुरक्षेसंबंधी आढावा घेतला.जिल्ह्यातील वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे अतिरीक्त बॅलेट युनिट राहणार आहेत. त्यासोबतच वर्धासाठी ४४८ व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची तपासणी करून निवडणुक रिंगणात असलेल्या मतदाराच्या यादीप्रमाणे मतदान यंत्र सज्ज ठेवण्यात येऊन आयोगाच्या सुचनेप्रमाणे मतदान यंत्र सिल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या हैद्राबाद येथील अभियंत्याकडून संपूर्ण यंत्राची तपासणी होत असून, या प्रक्रियेमध्ये निवडणुकीदरम्यान कुठलेच यंत्र बंद पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात. वर्धा विधानसभा मतदार संघासाठी लागणाऱ्या ईव्हिएम मशीनची तपासणी सामाजिक न्यायभवन येथे करण्यात आली. बुधवार दिनांक १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी इव्हिएम वाटपाचे कामही येथूनच पूर्ण होणार आहे. इव्हिएम मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून येथे २४ तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात येत आहे.यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, वर्ध्याचे निरवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व देवळी विधानसभा मतदार संघाचे शिरीष पांडे यांनी मतदानासाठी तयारी करण्यात आलेल्या ईव्हिएम मशीन व त्याच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. आर्वी येथे गांधी विद्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी अस्थायी कार्यालय सुरू करण्यात आले असून, निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया येथूनच पूर्ण होत आहे. निवडणुकीकरिता ३४१ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र लागणार असून, ३१० मतदान केन्द्रावर मतदान घेण्यात येणार आहे. मतदान यंत्राची तपासणी पूर्ण झाली असून, स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्र ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)