शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यात २२४ नवजात बालकांचा मृत्यू

By admin | Updated: March 25, 2017 00:48 IST

नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात.

प्रमाण होतेय कमी : १६,१४९ प्रसुतींची नोंद रूपेश खैरी   वर्धा नवजात बालकांचा मृत्यू रोखण्याकरिता शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. हे मृत्यू रोखण्यात या योजना तोकड्या पडत असल्याचे नोंदीवरून दिसत असले तरी वर्धेतील स्थिती तशी नसल्याचे दिसते. वर्धेत गत १० महिन्यात तब्बल २२४ नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली. शून्य ते एक वर्षे वयोगटातील बालकांची झालेली यंदाची नोंद ही गत चार वर्षांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे नवजात बालकांचा मृत्यू रोखण्यात जिल्हा आघाडी घेत असल्याचे दिसते. प्रसूतीदरम्यान आलेल्या अडचणी आणि वेळेवर मिळत नसलेल्या उपचाराअभावी नवजात बालकांचा मृत्यू होतो, असे संशोधनातून समोर आले. या प्रकारावर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जात आहे. राज्यात त्या अपयशी ठरत असल्या तरी वर्धेत त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गत चार वर्षांत नवजात अर्भकांचे झालेले मृत्यू आणि सुरू वर्षातील नोंद विचारात घेता नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्ह्यात गत १० महिन्यात १६ हजार १४९ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी २२४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागात आहे. शासनाच्या सुचनेनुसार राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हा दर शून्य असणे अपेक्षित आहे. वर्धेत त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसते.